जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जि.प. सेस फंडातून मंजूर मिल्किंग मशीन व मुक्त गोठा लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, भास्कर बंगाळ, अँड.राजेंद्र सोमाणी, डॉ.व्ही.आर.धिमटे, अनिल गाढे, दादासाहेब कुताळ, मच्छिंद्र खोसे, विलास भालेराव, दादासाहेब शेळके, महेश कु-हे, विशाल आंबेकर, कर्मचारी श्री.शिंदे, प्रसाद लड्डा, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.नवले म्हणाले की, जनतेने आपल्याला दोन वेळा जि.प.सदस्य पदाची संधी दिली. त्यामुळेचआपण कोट्यावधीचा निधी आणून विकास कामे करु शकलो . कृषी समितीच्या सभापतीपदावर काम करताना लोकांना शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ करुन दिला. आताही विकास कामासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे नवले यांनी सांगितले .
Post a Comment