बेलापूर:(प्रतिनिधी )- कोरोना काळात बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने चालविण्यात आलेले कोविड सेंटर हे सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.या सेंटरमुळे शासन यंञणेवरील ताण हलका होवुन सर्वसामान्य कोवीडग्रस्तांनाही दिलासा मिळाला असल्याचे मत तहसीलदार प्रशांत पाटिल यांनी व्यक्त केले. बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील मोफत कोवीड सेंटरचा तहसीलदार प्रशांत पाटील यांचे हस्ते धन्वंतरी पूजन व वृक्षारोपण करुन समारोप करण्यात आला त्या वेळी बोलताना. तहसीलदार पाटील म्हणाले की,कोरोना संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले होते.अशा संकट समयी बेलापूरकरांनी मोफत कोवीड सेंटर सुरु केले.या सेंटर मध्ये एकूण २५० रुग्णांवर मोफत औषधोपचार तसेच त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या कोविड सेंटर करीता समाजसेवी संस्था,दानशूर व्यक्तींनी देणग्या देवून तसेच अन्नदान करुन दिलेले योगदानही आदर्शवत व प्रेरणादायी असुन कोरोनाची तिसरी लाट येवू नये अशीच आशा बाळगु या परंतु तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यासाठी बेलापुरकर सक्षम आहेत याची खात्री पटली या कोवीड सेंटरमुळे शासनाचे काम देखील सोपे झाले नागरीकांची तपासणी करणे त्यांना क्वारंटाईन करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही कामे जि प शरद नवले सरंपच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व त्यांच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली पोलीस पाटील अशोक प्रधान यांनीही फार मेहनत घेतली आपल्या सर्वांच्या कष्टाचे चिज म्हणजे रुग्ण बरा होवुन घरी गेला असल्याचे पाटील म्हणाले. या वेळी जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी देणगीदार,अन्नदान देणारे दाते त सेच रुग्ण सेवा करणारे स्वयंसेवक,ग्रामस्थ,पञकार आदिंचे आभार मानले.या प्रसंगी,रणजित श्रीगोड,अजय डाकले,देविदास देसाई,नवनाथ कुताळ, विष्णुपंत डावरे,शांतीलाल हिरण,प्रशांत लढ्ढा,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड,पंकज हिरण,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पोलीस पाटील अशोक प्रधान,डॉ.मच्छिंद्र निर्मळ, डॉ.सुधीर काळे,डॉ.रविंद्र गंगवॅल, बाळासाहेब दाणी,मोहसिन सय्यद,अशोक राशिनकर,अकबर सय्यद,हर्षद दुधाळ,सुहास शेलार,शफीक आतार,किरण गागरे,गणेश बंगाळ,शफीक बागवान,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,प्रशांत मुंडलिक,राहुल माळवदे,रोहित शिंदे,कामगार तलाठी कैलास खाडे,ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, सचिन वाघ,गोपी दाणी,अशोक मेहेत्रे,सुधीर करवा,अरुण अमोलिक, नितीन नवले,दिलीप अमोलिक,किशोर खरोटे,सतीश शेलार,हर्षद दुधाळ,सोमनाथ जावरे,शुभम नवले,अजय शेलार,रावसाहेब अमोलिक, विशाल शेलार,भास्कर वारे,महेश कु-हे,सद्दाम आतार,नंदू शेलार,सुनील साळुंके,बाळासाहेब शेलार,भारत बुर्गुल,केशव काळे,अजित शेलार,प्रतिक काळे,सुखदेव गायकवाड, निखिल शेलार,अनिकेत भडके,सोनू खैरे,फिरोज सय्यद, सुभाष शेलार,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment