बेलापुर (प्रतिनिधी )- राहुरी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीबाहेर असलेल्या बेलापुर गावातील वाळूच्या गाड्या पकडून त्यांचेवर कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोड करुन त्या सोडून दिल्या असुन अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष व बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे केली आहे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे दिनांक १९ जुन ते २० जुन च्या रात्री दोन वाजता बेलापुर येथे आले व त्यांनी पढेगाव रोडवरुन वाळू वहातूक करणारी वाहने पकडून बेलापुर चौकातुन नेली या वाहनधारकाकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वसुली करण्यात आली असुन हे सर्व सी सी टी व्ही कँमेर्यात कैद झाले आहे त्यांची हद्द नसतानाही ते श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे आपल्या चार सहकार्यासमवेत आले त्यांनी वाळूच्या गाड्याही पकडल्या परंतु नंतर आर्थिक तडजोडी करुन त्या गाड्या सोडून देण्यात आलेल्या आहेत यात फार मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण झालेली आहे ज्या गाडीने पी एस आय शिंदे आले होते ती गाडी शिंदे यांच्या मुलाच्या नावावर आहे पी एस आय शिंदे यांनी केलेले कृत्य हे पोलीस खात्याला काळीमा फासणारे आहे आपल्या सारख्या कर्तबगार आधिकार्याच्या कार्यक्षेत्रात आशा प्रकारे कृत्य करत असेल तर न्याय कुणाकडे मागावा ही लुट म्हणजे कायद्याचे ज्ञान असणारांनी टाकलेला दरोडाच नव्हे काय ? त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुथा यांनी केली आहे.
Post a Comment