बेलापुर (प्रतिनिधी )- भाजपाच्या वतीने श्रीरामपुरात करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात श्रेयवादावरुन चाललेली धुसफुस अखेर चव्हाट्यावर आली असुन कार्येकर्त्या समोरच पदाधिकार्यांनी एकमेकावर तोंड सुख घेतल्याने कार्येकर्त्यांनी याचा काय आदर्श घ्यावयाचा हाच प्रश्न निर्माण झाला आहे महाअघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यांआंदोलना नंतर तहसीलदार श्रीरामपुर यांना निवेदन द्यावयाचे ठरले होते परंतु तहसीलदार कार्यालयात नाहीत असे भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकार्याने सांगितले त्यामुळे बेलापुररातील सुनिल मुथासह काही कार्येकर्ते निघुन गेले त्या नंतर त्याच पदाधिकार्यांने तहसीलदार साहेब कार्यालयात आले असुन आपल्याला निवेदन देण्यास जायचे आहे असे सांगताच बेलापुर येथील भाजपाचे पदाधिकारी प्रफुल्ल डावरे यांनी याचा जाब विचारला सुनिल मुथा सह काही कार्येकर्ते निघुन गेल्यावरच निवेदन देण्याचे का ठरविले असा जाब विचारताच भाजपाच्या जबाबदार पदाधिकार्याने जाब विचारणारे भाजपाचे पदाधिकारी डावरे यांना सर्वासमोर शिवी दिली त्यामुळे डावरे यांनी देखील मागेपुढे न पहाता त्याच भाषेत साडेतोड उत्तर दिले सर्व कार्येकर्त्यासमोरच पदाधिकार्यात एकमेकांना शिव्याची लाखोली वाहीली जात होती आंदोलन राहीले बाजुला परंतु श्रेय वादावरुनच भाजपा पदाधिकारी आपापसात भिडले एकमेकांना मनसोक्त अरेरावी शिवीगाळ झाल्यानंतर सुनिल मुथाही पुन्हा त्या ठिकाणी आले बेलापूरातील भाजपाचे कार्येकर्ते व मुथा समर्थक तातडीने जमा झाले परंतु तो पर्यंत श्रीरामपुरातील ते पदाधिकारी निघुन गेले होते नाही तर मुद्द्याची श्रेयवादाची लढाई गुद्द्यापर्यत पोहोचली असती आता हा श्रेय वादाचा चेंडू जिल्हाध्यक्ष याच्या कोर्टात पोहोचला आहे.
Post a Comment