राहुरी - दि.२९ जून रोजी राहुरी कृषी मंडळात केंदळ बुद्रुक, पिंप्री वळण व देसवंडी या गावांमध्ये मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत कापूस व सोयाबीन पिकांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. यावेळी तज्ञ पर्यवेक्षक तुळशीराम पवार यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी शरद लांबे व भिमराज गडधे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत चर्चेद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. चंद्रकांत म्हसे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली.यावेळी केंदळ बु.येथे सहाय्यक कृषी अधिकारी सोमनाथ बाचकर, शेतकरी प्रमोद तारडे,नामदेव तारडे, प्रल्हाद तारडे, भिमराज चव्हाण, बापूसाहेब मांगुर्डे,सदाशिव तारडे, बापूसाहेब तारडे, विठ्ठल भोसले, गोविंद जाधव व रामेश्वर कैतके उपस्थित होते.पिंप्री वळण येथे सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश बनकर, बिरू केसकर, आकाश गोरे, शेतकरी शत्रुघ्न आढाव, भाऊसाहेब पुंड,राजेंद्र गरूड, यशपाल पवार, बजरंग कानडे, मेघवर्मा जाधव, आबासाहेब लहारे,अशोक जरे,धनराज जाधव, बाबासाहेब डमाळे व आरिफ शेख उपस्थित होते.देसवंडी येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती विमल शेंडगे, महिला शेतकरी वैशाली शिरसाठ,शकुंतला शिरसाठ, अनुराधा शिरसाठ, उषा शिरसाठ आदी उपस्थित होत्या.
Post a Comment