बेलापुर (प्रतिनिधी )-मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बेलापुरात केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे पोलीसांनी धडक कारवाई करत अनेक दुकानदारांकडून दंड वसुल केला असुन चार नंतर दुकाने सुरु असल्यास कारवाई करण्याचा ईशारा बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी दिला आहे मा .जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून सर्व व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे असे असताना बेलापूरात चार वाजेनंतरही अनेक दुकाने सुरुच होती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ गावात फेरी मारुन दुपारी चार नंतर जी दुकाने सुरु होती अशा जवळपास वीस दुकानदारांना दंड ठोठावला आहे कोरोना नियमाचा भंग करणारावर यापुढेही अशीच दंडात्मक कारवाई सुरुच राहणार असुन नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावे असे अवाहन हवालदार लोटके यांनी केले आहे
Post a Comment