बेलापूर (प्रतिनिधी )-: जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी याची पुण्यतिथी बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी श्यामाप्रसाद मुखर्जी च्या प्रतिमेला गावातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.शरद देशपांडे व श्री.रमेश कुलथे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. दिवंगत श्यामाप्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळात कायम काश्मीरच्या विषेश राज्याच्या संकल्पनेला व कलम ३७० ला वेळोवेळी विरोध केला याच आंदोलनात अटक झालेली असताना तुरुंगातच त्यांना वीरमरण आले ,असे शेवटपर्यंत कलम ३७० ला विरोध करणार्या या व्यक्तीमत्वाने कॉंग्रेस विरूध्द संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची जबाबदारी उचलून "जनसंघा"ची स्थापना करून जनसंघाचे सरकार प्रस्थापित केले. अशा धुरंधर नेत्याला म्हणावी तशी प्रसिद्धी त्या काळी मिळाली नाही. कारण श्यामाप्रसादजी हे प्रसिद्धी पासून फार दूर राहीले .मोदी सरकारने मात्र ३७० कलम रद्द करुन खर्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जीच्या विचारांचा मानसन्मान वृद्धिंगत केला.बेलापूर मधील या कार्यक्रमास भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे,राजेंद्र राशीनकर,किशोर खरोटे,गजानन डावरे,विशाल मेहेत्रे, भुषण चंगेडे,राजेंद्र गाडेकर,प्रशांत ढवळे,सागर हुडे,योगेश सोनवणे, दादा कुताळ,सुभाष मोहिते आदि उपस्थित होते
.
Post a Comment