पत्रकार प्रकाश कुलथे यांना साईसंस्थान विश्वस्तपदी संधी मिळावी.श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे मागणी.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर निवड व्हावी अशी विनंती स्वरूप मागणी श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे करण्यात आली आहे. 

   आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डीचे साईबाबा संस्थान हे जगात श्रद्धाभावाचे तीर्थस्थान आहे.श्रद्धा आणि सबुरी ही  जीवनमूल्ये जपणारे, चरित्र आणि चारित्र्य,अभ्यास आणि भक्तीध्यास, संस्कृती आणि सदवृत्ती,शुद्धविचारांची पत्रकारिता, सामाजिक सेवाभाव,साहित्य आणि  परंपरा अशा गुणवत्तेने वाटचाल करणारे पत्रकार प्रकाश कुलथे जिल्ह्यातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत. श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, राज्य  अधिस्वीकृती समितीचे सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त उपाध्यक्ष, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णंकार संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक  उपाध्यक्ष,वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर संस्थेचे उपाध्यक्ष, साहित्य प्रबोधन मंच, श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष, टाकळीभान येथील साहित्य परिवाराचे संस्थापक सदस्य, वर्ल्ड सामनाचे मुख्य संपादक, दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अशा विविध संस्था आणि सेवाकार्यात सदैव सहभागी असलेले पत्रकार प्रकाश कुलथे हे श्रीसाईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा आदर्श जपत कार्य करतील असा आम्हा साहित्यिकांना विश्वास आहे, तरी त्यांची साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी निवड व्हावी अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते अविनाश आपटे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा डॉ बाबुराव उपाध्ये, नामदेवराव देसाई, सुखदेव सुकळे, डॉ.  शिवाजी काळे,कवी  पोपटराव पटारे, डॉ रामकृष्ण जगताप,कवयित्री  संगीता फासाटे कटारे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, पत्रकार शौकतभाई शेख,आदी साहित्यिक, पदाधिकारी यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget