श्रीरामपूर - शहरातील मिल्लत नगर भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी नगरपालिकेची असून आगामी काळामध्ये मिल्लत नगरचा सर्वांगीण विकास करून या उपनगराला शहरामध्ये आदर्श बनवू. येथील ओपन स्पेस मध्ये थत्ते ग्राउंड प्रमाणे जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक, वृक्षारोपण व इतर सुविधा लवकरच निर्माण करून देऊ असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.
शहरातील मिल्लतनगर भागातील सेक्टर २ व ३ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच सेक्टर १ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरपालिकेचे ज्येष्ठ नग
रसेवक बाळासाहेब गांगड, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, रईस जागीरदार, प्रकाश ढोकणे, कलीमभाई कुरेशी, सय्यद असलमभाई तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते शेख अकील सुन्नाभाई,शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, हाजी सय्यद युसूफभाई, गुलाब वायरमेन,अकबर पठाण, हाजी अमीन शेख, मुन्ना खान, असलम बिनसाद,तोफिक शेख, समीरखान पठाण, राजू जहागीरदार, अफरोज शहा,सलीम पटेल, युसुफ लाखानी, बाबुभाई वेल्डर, आरीफ दारूवाला,फारूक तांबोळी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक पुढे म्हणाल्या कि सुरुवातीची दोन वर्ष नगरपालिकेपुढं निधीच्या खूप अडचणी होत्या. मागील वर्ष कोरोणामुळे वाया गेले. आता पालिकेला आपले सरकार असल्याने शासनाकडून बर्यापैकी निधी प्राप्त होत आहे. शहरातील अनेक कामे आम्ही मंजूर करून ठेवली आहेत. आता त्या कामांना सुरुवात झाली आहे. मिल्लत नगर मधील सर्व प्रश्नांची मला जाण आहे. नजिकच्या काळामध्ये सर्व प्रश्न सोडविले जातील. मिल्लत नगर मधील ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठा आहे. महिना दीड महिन्यांमध्ये तो मार्गी लागेल.ज्या रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे त्याचे काम रमजान महिना सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे असे आदेश त्यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता यादव आणि संबंधित ठेकेदारांना दिले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी मिल्लत नगर मध्ये विकास झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. परंतु मिस्टर नगरसेवक अल्तमश पटेल यांनी आता लक्ष घातल्याने अनेक कामे मार्गी लागली आहेत. दोनच महिन्यांमध्ये पाईपलाईनच्या कामाला रितसर मंजुरी घेऊन ते काम आता होत आले आहे असे सांगून मिल्लत नगर मधील प्रमुख समस्या विशद केल्या. केला जाणारा रस्ता हा छोटा असून त्यामुळे अतिक्रमण वाढण्याची भीती असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चार फुटापर्यंत पेविंग ब्लॉक बसविण्याची मागणी त्यांनी केली. ती नगराध्यक्षांनी तात्काळ मंजूर केली.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपस्थित सर्व नगरसेवक व या भागातील प्रमुख नागरिक
शेख अकिल सुन्नाभाई,
सलीमखान पठाण,हाजी युसूफभाई सय्यद, युवानेते अल्तमश अन्सार पटेल, बाबुखान पठाण (वेल्डर),
आरीफभाई दारुवाला, हाजी अमीन शेख,युसूफ लाखाणी,
शकिल बागवान,शौकतभाई शेख,गुलाबभाई वायरमेन,
सलीम रसूल पटेल,फिरोज पिंजारी, अकबर पठाण, रहमान शाह,अफरोज शाह, टायगर सरयांच्या हस्ते रस्त्याचे व पाईपलाईनच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
प्रभागातील जनतेच्या वतीने नगराध्यक्षा आदिक यांचा आमेना गुलाब शेख व नूरजहान शेख यांनी तर अल्तमश पटेल यांचा अकिल सुन्नाभाई यांनी सत्कार केला .कार्यक्रमानंतर मिल्लत
नगरच्या मागील भागातील ड्रेनेज सिस्टीम ची नगराध्यक्षांनी पाहणी केली. यावेळी तेथील महिलांनी त्यांची गा-हाणी नगराध्यक्षांपुढे मांडली. त्या भागातील एकूण विदारक परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी खूपच नाराजी व्यक्त करीत नगर अभियंता यादव यांना तातडीने ड्रेनेज सिस्टिमचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.
मिल्लत नगर मध्ये कामे होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना यापूर्वी होती. परंतु अल्तमश पटेल यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर पटापट कामे मंजूर होऊन कामांना सुरुवात देखील झाली आहे. मिल्लत नगर मशिदी समोर बसवलेल्या पेव्हिंग्ज ब्लॉकची देखील त्यांनी पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्तमश पटेल, निरंजन भोसले, गुलाब वायरमेन, मुन्नाभाई, अन्वर भाई यांनी विशेष परिश्रम घेतले. रमजान महिना लवकरच सुरु होणार असल्याने ही कामे लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.