श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता.त्याची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्यांना जेरबंद केले आहे.राऊत वस्ती परिसरातील घरातून वास सुटल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी कळविली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा घरातील मृतदेहाबाबत माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अप्पर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत सदर मृतदेहाची पाहणी केली.यावेळी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे, पो. कॉ. किरण पवार तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी सदर व्यक्ती बाबत परिसरात व नातेवाईक यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती मिळविली. यावरून अमोल कसबे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी खबर दिली वैद्यकीय तपासणी नुसार सदर व्यक्तीचा घातपात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली होती.यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी परिसरात सापळा लावून जॅक ओहोळ यास ताब्यात घेत चौकशी केली असता जॅक ओहोळ या गुन्हेगाराने गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे तात्काळ गुन्ह्याचा उलगडा झाल्याने परिसरातून प्रशासनाचे व पोलीस नाईक संजय दुधाडे यांचे कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पुढील तपास करत आहेत.
Post a Comment