ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना सापडला इसमाचा मृतदेह.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील गट नंबर 16 या शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना सरीत पांढरे वस्त्र आढळून आले.यावेळी जवळून पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे दिसून आले. याबाबत ऊसतोड कामगारांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आसाराम गायधने यांना कळवले.त्यांनी गावातील कामगार पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह ओळखीचा आहे का? यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी गावातील गोरक्षनाथ गंगाधर मोरे (वय 65) हे दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात श्री. एकनाथ मोरे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस नाईक संंजय दुधाडे यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविताच सदर मृतदेह हा आमच्या वडिलांचा असल्याबाबत एकनाथ मोरे यांनी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आला आहे.यावेळी पोलीस पाटील श्री. गायधने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाला सहकार्य केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे व दत्तात्रय दिघे करत आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget