बेलापुर (प्रतिनिधी )- राज्यभर गाजलेले गौतम हिरण अपहरण व हत्याकांड प्रकरणात अखेर खरे गुन्हेगार शोधण्यात पोलीसांना यश आले असुन चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात खरे मुख्य गुन्हेगारांना जेरबंद केल्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेवुन सर्व घटनेची माहीती दिली या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे अनिल कटके अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप या वेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहीती देताना पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले की दिनांक १ मार्च रोजी गौतम हिरण यां व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले तेव्हा पासुन सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण विभागातील सर्व कर्मचारी डोळ्यात तेल घालुन दिवस रात्र तपास करत होते सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्यात आला याच दरम्यान गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांनी घेतला होता त्याच दरम्यान पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली या दोन आरोपींना अटक केल्यामुळे खरे गुन्हेगार मोकळे झाले या गुन्ह्याचा सर्व बाजुंनी तपास करत असताना एक गाडी उक्कलगाव मार्गे आल्याचे सी सी टी व्हीत दिसले त्यावरुन पुन्हा तपास सुरु केला असता ती गाडी सिन्नर येथील निघाली गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संदीप मुरलीधर हांडे राहणार माळेगाव तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने जुनेद उर्फ जावेद बाबु शेख वय २५ वर्ष रा नायगाव रोड सिन्नर अजय राजु चव्हाण वय २६ वर्ष रा मारुती मंदिरा समोर सिन्नर नवनाथ धोंडू निकम वाय २९ वर्ष रा उक्कडगाव तालुका कोपरगाव व एक २२ वर्षीय आरोपी यात सहभागी आसल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपींना अटक करण्यात आली असुन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती व्हँन एम एच १५ जी एल ४३८७ हिरन यांचा मोबाईल जप्त केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि मिथुन घुगे गणेश ईंगळे सोन्याबापु नानेकर मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे विजयकुमार वेठेकर संदिप घोडके विश्वास बेरड शंकर चौधरी विशाल दळवी रवि सोनटक्के विजाय ठोंबरे सचिन अडबल संतोष लोंढे ज्ञानेश्वर शिंदे दिपक शिंदे विशाल गवांदे योगेश सातपुते संदिप दरंदले रविंद्र घुंगासे शिवाजी ढाकणे सागर ससाणे मयुर गायकवाड मेघराज कोल्हे राहुल सोळूंके रोहीत येमुल आकाश काळे उमाकांत गावडे भरत बुधवंत अर्जुन बडे बबन बेरड चंद्रकांत कुसळकर फुरकान शेख प्रमोद जाधव यांनी केलेली आहे.
Post a Comment