बेलापुर (प्रातिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असुन नियम न पाळणावर कठोर कारवाई करा अशा सुचना प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिल्या बेलापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवुन बेलापुरगाव व परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यानी घेतला या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई उपस्थित होते. या वेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की सर्वांना मास्क सक्तीचे करा जे दुकानदार मास्क वापरणार नाही तसेच ग्राहाकांना मास्कची सक्ती करणार नाही अशी दुकाने सात दिवसासाठी सिल करा कोरोनाचा सामना करावयाचा असेल तर नियम पाळावेच लागतील नियम न पाळणारावर कठोर कारवाई करा अशा सुचनाही पवार यांनी ग्रामपंचायतीला दिल्या या वेळी गावात मास्क वापरण्याबाबत दवंडी दिलेली आहे तसेच मास्क न वापरणार्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिलेल्या असल्याचे सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे दिलीप दायमा किशोर कदम अकबर टिन मेकरवाले आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment