श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले.यावेळी त्यांच्याकडे तपासणी केली असता रोख रक्कम, मोबाईल व पत्ते आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहरातील मटका जुगार याचेदेखील काही ठिकाणी कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक परदेशी व पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी छापा टाकला. सदर आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मीळत आहे. .
Post a Comment