बेलापुर (प्रतिनिधी )-राज्यभर गाजलेले बेलापुरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खुनाचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले असुन केवळ सी सी टी व्ही च्या अधारे पोलीसांना आरोपी पकडण्यास मदत झाली त्यामुळे गावातील सी सी टी व्हीची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.बेलापुर येथील व्यापारी हिरण यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली त्या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एल सी बी व बेलापुर पोलीसांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी बोलताना उपसरपंच खंडागळे म्हणाले की गुन्हा अन्वेषण विभागाची टिम तसेच श्रीरामपुरातील सर्व पोलीस यंत्रणा या तपास कामी दहा बारा दिवस डोळ्यात तेल घालुन तपास करत होते अखेर सी सी टी व्ही फुटेजच्या अधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले त्यामुळे गावातील सर्व नादुरुस्त कँमेरे तातडीने दुरुस्त करण्यात येतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी आणखी कँमेरे बसवुन ते सुस्थितीत राहतील याची दक्षता घेतली जाईल या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की व्यापाऱ्याच्या अपहरणा नंतर सर्व गावाने एकजुट दाखविली हा प्रश्न विधानसभेत गाजला त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे पोलीसापुढे मोठे अव्हानच होते परंतु राज्यात अव्वल असणार्या एल सी बी टिमने व तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेतल्यामुळेच खरे आरोपी जेरबंद झाले पोलीसांनी केलेल्या कामगीरीबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे आपले कर्तव्य आहे या वेळी मोहसीन सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी एल सी बी चे मनोज गोसावी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदिंचा ग्रामस्थांच्या वातीने सत्कार करण्यात आला या वेळी रफीक शेख ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक मुस्ताक शेख तहसील कार्यालयातील शिवाजी वायदंडे लहानु नागले महेश कुर्हे पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे सागर साळवे राज गुडे आदि उपस्थित होते.
Post a Comment