शबे बरात ही प्रत्येक मुस्लिमांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण रात्र असून या रात्री प्रार्थने बरोबरच कबरस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी दुआ ही केली जाते. परंतु कोरोनामुळे यावर्षी पोलिसांनी अशा पद्धतीने गर्दी करू नये. त्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा सूचना केल्या होत्या. जामा मशिद ट्रस्ट व इतर सर्व मशिदींचे मौलानांशी विचारविनिमय करून पोलीस प्रशासन व धार्मिक संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे मुस्लीम समाजाने तंतोतंत पालन केले. त्यामुळे रात्री दरवर्षी दिसणारी गर्दी कुठेही दिसली नाही. रात्री नऊ नंतरच रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या घरांमध्ये प्रार्थना केली .
सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शासन आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शबे बरातच्या रात्री दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव मिलाद पठण करीत कबरस्थान मध्ये जातात. तेथे मुफ्तीसाहेबांचे प्रवचन होते. त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन फुलांची चादर किंवा फुले अर्पण केली जातात व दुआ केली जाते. मात्र सध्याच्या या वातावरणात अशी गर्दी केल्यास शहरातही प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन केल्याने त्याला प्रतिसाद देत सर्वांनी आपल्या पूर्वजांसाठी घरातूनच दुआ केली. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मुस्लिम समाजाची नेहमीच असते.त्याचा प्रत्यय रात्री देखील आला.
Post a Comment