यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले, जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाच लाख लिटरची पाणी साठवण व पाणी पुरवठा टाकी असून याच टाकीतून सध्या गावाला पाणी पुरवठा होत आहे.तिची मुदत संपल्याने व तिची पडझड झाल्याने तिचे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या मार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यांनी १ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाला सादर केला होता.त्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही टाकी तात्काळ पाडण्यात यावी असे पत्र ग्रामपंचायतीला दिले होते.मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.ही टाकी इतकी धोकादायक आहे की ती जोराच्या वाऱ्याने सुद्धा कोसळू शकते.असा काही अनर्थ झाला तर गावाला पाणी पुरवठा करता येणार नाही.नवीन टाकी उभारण्यासाठी कोरोनामुळे तात्काळ निधी उपलब्ध होणार नाही.तरीपण २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्तआयोगातून १० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी तरतूद केली जाईल.१५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून जास्तीस जास्त निधी नवीन पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी द्यावा लागणार असल्याने गावातील इतर विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे गावातील रस्ते, गटारी या कामासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यांच्या कडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील काळात 4 कोटी खर्चाची पाणीपुरवठा प्रस्तावित केल्याचे तत्कालीन सत्ताधरी मंडळी सांगतात पण ह्या योजनेत वाड्या वस्त्यांचा समावेश नव्हता व नवीन पाण्याची टाकी देखील प्रस्तावित केलेली नाही.
टाकी बांधण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी दिला जाईल परंतु टाकी बांधण्यास दिड वर्षाचा कालावधी लागु शकतो या काळात काही घटना घडल्यास गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय असा सवालही साळवी व खंडागळे यांनी केला आहे. मागील काळात पाणी साठवण तलावात साठलेला गाळ,शेवाळ आदी काढले नसल्याने खराब पाणी येत होते.त्याची कार्यवाही पण आम्ही सुरू केले आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेती महामंडळाकडून जागाही प्राप्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे साळवी व खंडागळे यांनी सांगितले.कै .भागवतराव खंडागळे पा सरपंच असताना ही पाण्याची टाकी बांधलेली होती आता त्यांचा नातु अभिषेक खंडागळे उपसरपंच असताना त्याने नविन दहा लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे हा योगायोगच म्हणावा लागेल.
Post a Comment