बेलापुर (प्रतिनिधी )- राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण अपहरण व खुन प्रकरणाचा तपास केवळ सी सी टी व्ही मुळे लागला असुन सी सी टी व्ही असणार्या त्या शाळेचा सन्मान जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करुन खुन करण्यात आला या घटनेबाबत बेलापुर ग्रामस्थांनी एकजुट दाखवत गाव बंद ठेवण्याचा ईशारा दिला होता हा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत उचलुन धरला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी दिवस रात्र एक करुन आरोपी शोधण्याचा प्रयत्न करत होते घटनेला आठ दिवस उलटुनही हिरण यांच्या खुन्याचा तपास लागत नव्हता सर्व पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणाहून हिरण यांचे अपहरण झाले तेथुनच पुढे तपास करत होती श्रीरामपुर पोलीस गुन्हे अन्वेषणची टिम कठोर मेहनत घेवुनही हाती काहीच लागत नव्हते त्यामुळे आरोपी येताना कोणत्या तरी रस्त्याने आले असतील हा विचार एल सी बी च्या अधिकाऱ्यांना आला अन त्या दिशेने तपास सुरु झाला बेलापुरला येणारे सर्व रस्ते रस्त्याच्या कडेला असणारे सी सी टी व्ही तपासण्याचे काम एल सी बी ने हाती घेतले हे करत असताना उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील न्यू इंग्लिश स्कूल व रावसाहेब बाळाजी पा थोरात कला कनिष्ट महाविद्यालय येथील शाळेत सी सी टी व्ही असल्याचे एल सी बी पथकाला समजले त्यांनी तातडीने उक्कलगाव येथील सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावले व शाळेतील कँमेरे तपासावयाचे आहेत असे सांगितले दिलीप थोरात यांनी ताताडीने महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर यांना शाळेत बोलावले व पोलीसांना सहकार्य करत कँमेरे तपासण्यास परवानगी दिली अन चार वाजेच्या दरम्यान एक गाडी रस्त्याने जाताना दिसली त्या गाडीची नंबर प्लेट ओझरती दिसली एल सी बी च्या पथकाने आपले सर्वस्व पणाला लावून त्या नंबरशी मिळत्या जुळत्या ३० ते ३५ गाड्या शोधुन काढल्या अन अखेर आरोपींनी वापरलेली गाडी पोलीसांच्या ताब्यात आली अन खरे आरोपी जेरबंद झाले आरोपींच्या मुसक्या आवळताच पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला हे केवळ शाळेने लावलेला एक कँमेरा रस्त्याच्या दिशेन असल्यामुळे शक्य झाले त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उक्कलगाव येथील शाळेचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर व सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावून त्यांचा सन्मानपत्र देवुन गौरव केला.
Post a Comment