December 2020

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी)हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष व तिरंगा न्यूज चैनल आणि बिंदास न्यूज पोर्टल चे संपादक असलम अवद बीनसाद यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पत्रकार संघाचे सचिव श्री किशोर गाडे यांनी दिली असलम बिनसाद हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवित आहे. तसेच तिरंगा न्यूज चैनल चे संपादक म्हणून उत्कृष्टपणे न्यूज चैनल चालवीत आहे.

      याचप्रमाणे बिंदास न्यूज पोर्टल चैनल च्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्यांना प्राधान्य देऊन उत्कृष्टपणे मीडिया पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेता त्यांची महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अहमदनगर या पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी त्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, बी.के.सौदागर, अमीरभाई  जहागीरदार,राजमोहंमद शेख,

शेख फकीर महंमद, विलासराव पठारे, रियाजखान पठाण, सुभाषराव गायकवाड, किशोर गाडे, अकबरभाई शेख, अक्रम कुरेशी, अरुण बागुल, रमेश शिरसाट, जावेद भाई शेख, शब्बीर कुरेशी, उस्मान भाई शेख, मनसुर भाई पठाण, सुखदेव सोमा केदारे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील भाई शेख, वहाब खान, अन्वर पठाण, अरुण त्रिभुवन, विजय शंकर खरात, सज्जाद भाई पठाण, जिशान काझी, रवींद्र उगलमुगले, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख, दस्तगिर शाह, शहानवाज बेगमपूरे, अशोक कोपरे, मिलिंद शेंडगे, हाजी हनिफभाई तांबोळी, साजिद भाई शहा, मोहम्मद इलियास छोटू मिया शेख, मोअज्जम हाजी रज्जाक,  गुलाबाई वायरमन, 

शेख हनीफ युसुफ, सय्यद असिफ अली आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागाकरीता होणार्या निवडणूकीत प्रभाग १ मधुन *सर्वसाधारण स्त्री गटात*                      १)शेख जेबनाज शोएब                         २)सय्यद बेगम                                   ३) बागवान तबस्सुम                            ४) शेख शिरीन जावेद                         ५) खटोड निशा रविंद्र                            *ना  मा   प्र स्त्री*                                    १) बागवान फरहा शाकीर                   २) बोरुडे रंजना किशोर                   ३) खोडाळ सुष्मा तुषार                       ४)कुर्हे  प्रियंका प्रभाकर                     ५) देसाई प्रतिभा देविदास                    ६) ढवळे माधुरी प्रशांत                         ७) बागवान नुरजहाँ अकील                  *सर्व साधारण पुरुष*                              १)जोशी गोपाल रमेश                        २) जाजु जयप्रकाश स्वामीनारायण          ३)गोरे संजय   बाबुराव                       ४) पठाण हुसेनखान जमादार          ५)शेख मोहसीन ख्वाजा                       ६) वाबळे रविंद्र ज्ञानदेव                       ७) गुलदगड रमेश                              ८) शेख जावेद जमालभाई                  ९)बागवान आसीफ नुरा                       १०)राशिनकर राजेंद्र  मोहन                  ११)खटोड रविंद्र मुरलीधर                     १२)नाईक विक्रम                                १३ )गागरे किरण अर्जुन          *प्रभाग क्रमांक दोन*                              १) खरोटे किशोर लक्ष्मण                      २)डावरे प्रफुल्ल हरिहर                       ३)साळुंके भरत अशोक                       ४)चायल कैलास मदनलाल                ५) काळे यादव गोविंद                        ६) मेहेत्रे विशाल विलास                        *अनु.    जाती   स्त्री*                             १)पवार नंदा अनिल                              २) तेलोरे प्रज्ञा भाऊसाहेब                    ३) अमोलीक सविता उत्तमराव             ४) साळवी वैशाली जगन्नाथ                ५) सोनवणे छाया विलास                      ६) आव्हाड छाया अशोक                   ७) शेलार सुभद्राबाई एकनाथ                   ८) शेलार गितांजली गणेश                   *सर्व साधारण स्त्री*                               १)पौळ शिला राम                             २)खटोड निशा रविंद्र                           ३) खरात शारदा दत्तात्रय                    ४) दायमाकृपा आनंद                         ५)बनभेरु सोनाली हेमंत                     ६)देसर्डा रुपाली  अतिश                    *प्रभाग    क्रमांक ३*                         *सर्वसाधारण व्यक्ती*                      १)नाईक चंद्रकांत  गुलाबराव               २)शेख शोऐब ईस्माईल                       ३)खंडागळे अभिषेक भास्करराव           ४)शेख नवाज ईलियास                      ५) कुर्हे महेश                                   ६)जाजु जयाप्रकाश स्वामीनारायण        ७)नाईक अक्षय अरुण                        ८)सय्यद मुसा सजनअली                   *नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री*        १)कुर्हे गौरी चेतन                               २)कुर्हे प्रियंका प्रभात                        ३) लगे कल्याणी रमेश                       ४)बागवान फराह शाकीर                  *प्रभाग क्रमांक चार*                      *सर्व साधारण व्यक्ती*                     १)शेख मुस्ताक उमर                         २)शेख जाकीर हसन                           ३)सय्यद फिरोज अबुताहेर              ४)जाजु जयप्रकाश स्वामीनारायण        ५)शेख मोहसीन ख्वाजा                   ६)शेख जाकीर आहमद                     ७) सय्यद हारुन मेहेमुद                       ८) गवते अशोक काशिनाथ                  ९)सय्यद अजिम अयाजअली                 *अनु   जमाती    स्त्री*                      १)उषा सांजय बर्डे                             २) कमल भगवान मोरे                        ३)सुनिता  राजेंद्र बर्डे                     *ना  मा प्रवर्ग स्त्री*                             १)लगे कल्याणी रमेश                        २)कुर्हे प्रियंका प्रभात                          ३) निंबाळकर छाया बाळासाहेब           ४) नवले कांचन महेश                    ५) बागवान नुरजहाँ   अकील                ६)गवते सुनिता अशोक                       *प्रभाग   क्रमांक  पाच*                      *सर्व साधारण व्यक्ती*                       १)पठारे सनि दिलीप                          २) यादव अच्छेलाल इंद्रजित              ३)सोनवणे राम दत्तात्रय                        ४)साळवी महेंद्र जगन्नाथ                     ५) बोंबले महेश रावसाहेब                   ६)साळवी किरण जगन्नाथ                  ७) सोनवणे राजेंद्र सुखदेव                    ८)बोंबले शरद बाबासाहेब                     ९)भोसले सुविध अरुण                        १०)साळवे विशाल  डँनियल                    ११)शिरसाठ सुरेश नारायण                  १२)काकडे जनार्धन एकनाथ               *ना   मा   व्यक्ती*                        १)कुर्हे विजय लहु                                  २)मेहेत्रे प्रकाश चांगदेव                        ३)कुर्हे वैभव विलास                              ४) कुर्हे प्रभाकर गोविंद                        *अनु    जाती स्त्री*                              १)ऐडके राणी मिलींद                              २)साळवी वैशाली जगन्नाथ                  ३)झीने कविता बाबुराव                             ४)साळवी मिना अरविंद

बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुरातील भांड गल्ली व काळे गल्ली येथील सार्वजनिक  रस्ता बंद केल्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत असुन हा रस्ता खुला करावा अशी मागणी अन्सार बाबनभाई तांबोळी यांनी केली आहे. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात अन्सार तांबोळी यांनी पुढे म्हाटले आहे की काळे गल्लीत राहाणार्या ४० ते ५० कुटुबांचा अनेक वर्षापासून या रस्त्यावरुन वावर होता परंतु येथील एका व्यक्तीने ती शासकीय जागा आपल्या मालकीची आहे असे समजुन नागरीकांचा नेहमीचा रस्ता दगड माती लाकडे ओंडके टाकुन बंद करण्याचा प्रयत्न केला आहे या बाबत अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करुन देखील काहीच उपयोग झाला नाही या भागात राहणार्या ४० ते ५० कुटुंबाला हा रस्ता अडविल्यामुळे वहातुकीसा व ये जा करताना  त्रास होत असुन काही अघटीत घडल्यास रुग्णवाहीका अथवा अग्नीशामक दलाची गाडी येणेच मुश्कील आहे त्यामुळे तातडीने हा रस्ता नागरीकासाठी खुला करुन द्यावा अशी मागणी तांबोळी यांनी केली असुन आमच्या निवेदनावर कार्यवाही झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही तांबोळी यांनी दिला आहे.

राहुरी (प्रतिनिधी मिनाष पटेकर )वरवंडी मुलानगर ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करिता  विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीची धुरा युवकांनी हाती घेतली असून निष्क्रिय सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखविण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे तसेच जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे जनतेच्या विकासासाठी झटणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरविले आहेत निस्वार्थपणे कायमच जनतेला मदत करणारे सलीम भाई शेख प्रियंका त्रिभुवन अर्चना पवार व मुन्नाभाई परदेशी यांची उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिली असून भरघोस मतांनी निवडून देण्याची प्रतिज्ञा ही घेतली आहे स्ट्रीट लाईट आरोग्य रस्ता गावठाण पर्यटन शिक्षण पाणीपुरवठा या मुद्द्यांवर सतत कार्यरत असणारे सलीम भाई शेख यांना यावेळी उमेदवारी देऊन जनता ऋण फेडण्याच्या विचाराधीन आहे याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली वायसे मामा दिलीप बर्डे कैलास बर्डे आकाश बिराडे राजेश परदेशी जालिंदर गायकवाड किशोर पवार शुभम त्रिभुवन अल्ताफ पठाण साहिल शेख बाळू जाधव सुनील अडसुरे अन्सार पठाण वैभव खरात गणेश मोरे सुनील माळी व सर्व मुळानगर युवावर्ग व संपूर्ण ग्रामस्थ यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्व उमेदवारांनी नाम निर्देशन अर्ज ग्रामपंचायत वरवंडी करिता भरलेले आहे

*

सांगली - आटपाडी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक करत चोरलेला बोकड हस्तगत केले आहे. यानंतर बोकडाच्या मालकांनी पोलिसांचा सत्कार करत गावातून बोकडाची मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे. दीड कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सोमनाथ जाधव यांच्या या महागड्या बकऱ्याची हाय प्रोफाईल पद्धतीने एका आलिशान गाडीतून चोरी झाल्याचे समोर आले होते. 

या घटनेमुळे आटपाडी नव्हेचं तर सांगली जिल्ह्यातील खळबळ उडाली होती. महागड्या बोकडाची झालेल्या चोरीमुळे बोकड मालका सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात बोकड चोरीचा गुन्हा दाखल केले होता. 16 लाखांचा बोकड चोरीच्या घटनेमुळे आटपाडी पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास सुरू केला होता. आणि तपास सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका संशयित गाडीतून बकरा घेऊन काही जण आल्याची माहिती मिळाली आणि विटा पोलिसांनी यावेळी तिघा संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असणारे बोकड ताब्यात घेतल आहे.

आटपाडी पोलिसांनी चोरीला गेलेला बोकड शोधून काढण्याची माहिती मिळताच सोमनाथ जाधव आणि आटपाडी येथील ग्रामस्थ हे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जमले आणि चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचा सत्कार करत, आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आटपाडी शहरातून 16 लाखांच्या बोकडाची जंगी मिरवणूक काढली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत स्थापनेला शभंर वर्ष पुर्ण होत असुन गावात निवडणूक निमित्ताने होणारी कटुता पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व गावचा । विकास होण्यासाठी बेलापुर पत्रकार  संघाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेला पुढाकार योग्य असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले आहे           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावाची लोकसंख्या २५ हजार असुन १४ हजार मतदार आहेत या सर्व लोकाच्या हिताचे निर्णय घेणारे काही ठराविकच लोक आहेत गावाच्या हिताचे निर्णय घेणार्या पुढार्यांनी गाव हे केंद्रस्थानी ठेवुन ही निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी मनापासुन सहकार्य करावे गावातील अनेक नागरीकांचीही तशीच इच्छा आहे सर्व नेते मंडळींना विनंती आहे की  गाव महत्वाचे की नाव हे आपणच ठरवायचे आहे बेलापुर पत्रकार संघाने गावांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असुन सर्वांनी गट तट मतभेत बाजुला ठेवुन गावचा ईतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहीजे सर्वांनी मनावर घेतले तर काहीच  अवघड नाही तसेच कुणावरही दबाव न आणता आपण ही निवडणूक बिनविरोध करावी गावासाठी सर्वांनी दोन पावले मागे यावे आपणाला तालुका जिल्हा पातळीवर कारखाना बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद अशा इतर निवडणूका आहेत गावात सलोख्याचे चांगले वातावरण ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून गावच्या विकासाचा एक कृती आराखडा ठरवुन काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही काल काय झाले कुणी काय केले  हे सर्व मतभेद विसरुन स्वच्छ मनाने उद्याच्या सुंस्कृत  बेलापुर गावाकरीता एकत्र होवुन गावची निवडणूक बिनविरोध करु या असेही जि प सदर शरद नवले यांनी म्हटले आहे.

बेलापुर(वार्ताहर)गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कोनाचीही गय केली जाणार नाही, असा ईशारा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेलापुर पोलीस चौकीत विविध पक्षांचे स्थानिक प्रमुख, पत्रकार व ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ते सोडून जर कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर ताबडतोब पोलीसांना कळवा आम्ही त्यांच्यावर  कोणताही पक्षपात न करता त्वरित गुन्हे दाखल करु असेही नोपानी यांनी यावेळी आश्वाशीत केले.*या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई माजी सरपंच  भरत साळुंके पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा द्वारकनाथ बडधे प्रा अशोक बडधे आदिंनी मनोगत व्याक्त केले या बैठकीला सर्वश्री ,रविंद्र खटोड ,पोलीस पाटील अशोक प्रधान, अशोक प्रधान,युवराज जोशी,कैलास चायल, अशोक पवार, जावेद शेख, अकबर सय्यद,प्रा. अशोक बडधे,अजय डाकले, द्वारकानाथ बडधे, पत्रकार ज्ञानेश गवले, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, अशोक शेलार,यांच्यासह पो. हे. कॉ. अतुल लोटके, रामेश्वर ढोकने, निखिल तमनर, हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर समाजाने शाबासाकीची थाप दिल्यास असे कार्य करणारांचा उत्साह वाढतो त्यामुळे असे कार्यक्रम सर्वच स्तरावर राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बेलापुर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी केले                                           नाताळ सणाचे औचित्य साधुन शालोम ए जी चर्च बेलापुर यांच्या वतीने कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन सामाजाची काळजी घेणार्या सर्व क्षेत्रात काम करणार्या बांधवांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे डाँ देविदास चोखर हवालदार अतुल लोटके उपस्थित होते                     या वेळी बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पंडीत सिस्टर आदिंनी मनोगत व्यक्त केले 

शालोम ए जी चर्चचे पास्टर अलिशा जोगदंड यांनी कोरोना सारखे संकट पुन्हा येवु नये सर्वांना सुख शांती मिळावी या साठी प्रार्थना केली या वेळी बेलापुर पोलीस स्टेशनचे निखील तमनर बेलापुर पत्रकार सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम कामगार तलाठी कैलास खाडे अविनाश शेलार बाबासाहेब प्रधान सुशिलाबाई खरात मधुकर गायकवाड जालीदर गाढे अमोल साळवे सचिन साळुंके आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी महसुल कर्मचारी बेलापुर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषीकेश जाधव प्रसाद शेलार ललीत शेलार निशिकांत शेलार संकेत गीरमे प्रसाद अमोलीक गौरव शेलार आदिनी विशेष प्रयत्न केले ऋषीकेश जाधव यांनी आभार मानले.

अहमदनगर- नगर शहरातील दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौकात पोलिसांनी थांबवलेल्या मोटारीत चार धारदार तलवारी सापडल्या. मोटारीतील ड्रायव्हर सीटच्या मागे पांढऱ्या गोणीत या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पकडण्यात आलेल्याचे नाव अशोक बाळासाहेब राळभाते (रा.रत्नापूर, ता.जामखेड) आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई एलसीबी पथकाने केली.
याबाबतची माहिती अशी की, पो.हेकॉ संदीप घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती कि, अशोक राळेभात (रा. रत्नापूर, ता.जामखेड) हा त्याचे ताब्यातील चारचाकी मोटारीतून चार तलवारी घेवून दिल्ली गेटकडून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणार असल्याची ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी नीलक्रांती चौकात फौजफाटा तैनात केला होता व ही गाडी आल्यावर पंचांसमक्ष तिची झडती घेतली. कारमध्ये ड्रायव्हर सीटचे पाठीमागील बाजूस एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये ३ हजार ८०० रुपये किमतीच्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. या तलवारींबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती सांगितली नाही. त्यामुळे या तलवारी व तसेच ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत म्हणजे ३०डिसेंबर रोजी  सर्व पक्षीय बैठक घेवुन बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा या सर्वपक्षिय प्रमुखांनी  मांडलेल्या सुचनेला  कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.                                        श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर बु!! गावाची ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी रोजी होत असुन १७ जागेकरीता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव बेलापुर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळीसमोर मांडला होता या प्रस्तावास सर्वपक्षिय  प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर काल पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक  बोलविण्यात आली होती.  त्या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत बेलापुर ग्रामपंचायत  सदस्य निवडी बाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली. या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी सांगितले की संर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला पँनलचे उमेदवारी अर्ज दाखल करुन दिनांक ३०डिसेंबर रोजी सर्व उमेदवार यांची माहीती तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा फाँर्म कोअर कमिटीकडे जमा करावेत. या सर्व अर्जातुन सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हा सतरा जणाचा पँनल हा गावचा पँनल असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावाचा पँनल विरुध्द ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष  गट तट विसरुन एकत्र होवुन गावाच्या निर्णया विरुध्द जाणाऱ्या  उमेदवारांविरुध्द विरोधात सर्वपक्षिय  नेते मंडळी प्रचार करतील या मुथा यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले,माजी सरपंच भरत साळुंके, भाजपाचे शहर प्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले ,विक्रम नाईक,  हाजी ईस्माईल शेख आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनिवरुन या प्रस्तावास संमती दिली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, सुनील मुथा,नवनाथ कुताळ,ज्ञानेश्वर गवले दिलीप दायमा आदि उपस्थित होते शेवटी पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथून इंदूरची महिला  तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती ती इंदूर येथे आता सापडली आहे, मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली होती, मात्र तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली होती, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यासंदर्भात मिसिंग  गुन्हा दाखल झाला असला तरी  हे प्रकरण खंडपीठा पर्यंत गेले होते ,त्यामुळे ते संपूर्ण राज्यात गाजले होते ,मात्र ही महिला इंदूरची व ती तीन वर्षांनी परत इंदूरमध्येच सापडली, ही महिला सध्या काही सांगत नाही ,असं तिचा पती मनोज सोनी  म्हणतो, मात्र इंदूरची महिला इंदूरमध्ये सापडते ती शिर्डीतून बेपत्ता झाली तीन वर्ष गायब होती आणि आता परत इंदूरला सापडते या पाठीमागे काहीतरी गौडबंगाल आहे ,मात्र त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत आहे, विनाकारण शिर्डी चे नाव त्यामध्ये बदनाम होत असून शिर्डीतून महिलांचे अपहरण होते याची चर्चा देश-विदेशात झाली त्यामुळे शिर्डीचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला याला कारणीभूत मनोज सोनी व दीप्ती सोनी हेच आहेत, त्यामुळे या दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे,

  जितेश लोकचंदानी यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या या मागणी पत्र पुढे म्हटले आहे की, इंदौर येथील सोनी परिवार शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता ,दि, १० /८/२०१७रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर  प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता व नंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती, तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही मिळुन आली नाही , हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे ,असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला  तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे , 

      याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी  पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन   १७तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे ,या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली  या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले शिर्डी  विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे ,याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, शिर्डी शहरात मानवी तस्करी होते ,याबाबत मोठा गाजावाजा झाला होता , शिर्डीतून महिलांच्या पोरं होते अशी मोठी चर्चा राज्य झाली होती त्यामुळे शिर्डी चे नाव मोठे बदनाम झाले होते त्यामुळे आर्थिक उलाढालीवर शिर्डीत फटका बसला होता ,आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर. आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे दीप्ती मनोज सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे ,हे खरे बोलतात की खोटे बोलतात, हे संपूर्ण नागरिकांना, साईभक्तांना कळणे गरजेचे आहे ,ही महिला बेपत्ता होते व इंदोर मध्ये स्वतःच्या शहरात सापडते, या पाठीमागे कोण आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते म्हणून बदनाम केल्यामुळे मनोज सोनी व ,दिप्ती सोनी यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,अशी मागणी साई भक्तांच्या वतीने जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असून या दोघांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे,


श्रीरामपूर प्रतिनिधी :-महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने जानेवारी 2021 मध्ये आयोजित कै. वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ पत्रकार संघाचे श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात रविवार दिनांक 20- 12-2020 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार, उपाध्यक्ष बी.के.सौदागर, महासचिव शेख फकीर मोहम्मद, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड.हाजी मसूरभाई जहागीरदार, प्रदेश महासचिव फकीर महंमद शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मंन्सूरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाबखान,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजमोहंमद शेख यांनी केले या बैठकीत स्नेहमेळावा कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली याच बरोबर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडणे करीता कार्यक्रम समितीची निवड करण्यात आली. या समितीवर अब्दुल्ला भाई चौधरी,अमीरभाई जागीरदार, मन्सूरभाई पठाण, रियाज खान, अस्लम बिनसाद, वहाब खान, विजय खरात,सज्जादभाई पठाण, राजमोहंमद शेख, मिलिंद शेंडगे,आदींची निवड करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी भारतीय मीडिया फाउंडेशन इतर पत्रकार संघांना बरोबर घेऊन काम करण्याची दानत ठेवून लघु वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या अडचणी सोडविणे करिता प्रयत्नशील आहे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बिंदुसार जी यांनी पत्रकारांना किमान वेतन द्यावे त्यांच्या विमा पॉलिसी बद्दल हमी घ्यावी पत्रकारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक सवलती द्याव्यात पत्रकारांना निवास्थान देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना त्यांना पुढील आयुष्य साधारणपणे जगता येईल अशी भरीव मदत द्यावी पत्रकार संरक्षण कायद्यात किमान तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना समाविष्ट करून घेण्यात यावे अशाप्रकारे पत्रकारांच्या विकासाबद्दलचा विचार करता अनेक मागण्या केंद्र शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे याकरिता मीडिया फाउंडेशन च्या वतीने दिल्ली येथील रामलीला मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बरकत अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकाराला जात नसते जनसेवा करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करणे हीच खरी पत्रकारिता ठरते सध्या पत्रकारितेला व पत्रकार संघांना जातीय स्वरूप दिले जात आहे आशा पत्रकार संघापासून पत्रकारांनी दूर रहावे व देशातील एकात्मता जोपासावी आपण याच उद्देशाने गेली पस्तीस वर्ष लघु वृत्तपत्रांच्या पत्रकारांना सोबत घेऊन लिखाणाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याचे व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्याचे कार्य करीत आहे. पत्रकार बांधवांवर झालेल्या अत्याचारास पत्रकार संघाकडून  त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही केलेला आहे. ज्यावेळेस पत्रकारांवर व त्यांच्या लेखणीवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले अशा वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने त्या पत्रकारांना त्या खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हा पत्रकार संघ सर्वसामान्य जनता व पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. बैठकीस प्रा. त्रिभूवन सर,दस्तगिर शाह, गरीबी निर्मुलन समितीच्या शबाना भाबी, मोहंमद इलियास,साजिद शाह,गुलाब भाई वायरमन, अरुण बागूल, अक्रम कुरेशी, शब्बीर कुरेशी, प्रतापसिंग  राठोड, मुअज्जम शेख,जिशान काझी,सलीम गोसावी,अफजल खान,अकबर भाई शेख, सुभाषराव गायकवाड, मोहन जाधव, संजय शेलार, रमेश शिरसाठ,अमोल शिरसाठ,आदी पत्रकार उपस्थित होते. फकीर मोहंमद शेख यांनी शेवटी आभार शेवटी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.


 
बेलापूर ः-(प्रतिनिधी )-बेलापूर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची प्रक्रिया  सर्व कायदेशीर बाबींचे पालन करुन कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाणार आहे.त्यामुळे यासंदर्भात कोणतीही शंका  बाळगण्याचे कारण नाही.अखेर निवडणुक बिनविरोध करायची की नाही हे अंतिमतः सर्वपक्षिय नेत्यांच्या व ग्रामस्थांच्याच भुमिकेवरच अवलंबून असेल असा खुलासा बेलापूर पञकार संघाकडून करण्यात आला आहे.

              यासंदर्भात बेलापूर पञकार संघाने प्रसिध्दिसाठी दिलेल्या पञकात म्हटले आहे की,. राजकीय कटुता टाळावी तसेच निवडणुकीवर होणारा अनावश्यक अफाट खर्च गावाच्या विकासाचे कारणी लागावा यासाठी निवडणूक बिनविरोधी व्हावी अशी बेलापुर पत्रकार संघाची अपेक्षा  आहे 

या बाबत अनेक ग्रामस्थांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा भावना पत्रकार संघाकडे व्यक्त केल्या          ग्रामस्थांच्या या भावनांना प्रतिसाद म्हणून बेलापूर पञकार संघाने निवडाणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतला.यासाठी गावातील सर्वपक्षियांची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीस सर्वपक्षिय  नेते,विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत सर्वांशी चर्चा करुन सर्वसंमतीने प्रस्ताव ठरविण्यात आला.

          यानुसार ज्यांना उमेदवारी करावयाची आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावेत.त्यानंतर ज्यांना बिनविरोध निवडणुकीसाठी नावे द्यायची आहेत त्यांनी आपली नावे  यासंदर्भात नियुक्त समितीकडे द्यावीत.बिनविरोध निवडणुकीसाठी पञकार संघाचे कोणीही सदस्य उमेदवारी करणार नाही त्यानंतर ग्रामस्थांची बैठक घेवून आलेल्या नावांतून वार्डनिहाय व प्रवर्गानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून  सतरा उमेदवार निश्चित केले जातील.बिनविरोध निवडणुक वा उमेदवारी करणे याबाबत कोणासही कोणतीही सक्ती नसून केवळ गावाच्या हितासाठी पञकार संघाने पुढाकार घेतला आहे..याउपर ज्यांना उमेदवारी करावयाचीच असेल तर मग रितसर निवडणूक होईल.अशावेळी काय भुमिका घ्यावयाची ते ग्रामस्थ व  पञकार संघ ठरवतील .असा बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव असून तो नीटपणे समजून घ्यावा.अखेर बिनविरोध निवडणूक  प्रस्तावाबाबत काय करायचे हे सर्वपक्षिय नेते व ग्रामस्थांनी ठरवायचे आहे असे बेलापुर पञकार संघाने स्पष्ट केले आहे.

जामखेड-जामखेड पोलिस ठाण्यात चोरीलूट प्रकरणी दि. 10 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलाला माल हा प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे याच्याकडे असल्याने त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अहमदनगर एलसीबी पथकाने केली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. या दरम्यान दुचाकीला चोरट्यांनी त्यांची दुचाकी आडवी लावली. फिर्यादी व पतीस यांना ढकलून देऊन चाकूचा धाक दाखवून गळ्यातील कानातील दागिने, मोबाइल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी झुलेखा चंदुलाल पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात लूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्ह्यातील

आरोपी प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांच्याकडे असल्याची माहिती पो. नि. अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार श्री कटके यांनी त्यांच्या पथकाला त्यांनी दिल्या. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन आरोपी प्रकाश शिंदे याचा शोध घेऊन त्याला मुद्दामालासह ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनील कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, रणजित जाधव, रोहिदास नवगिरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोना कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

गावाच्या सर्वांगीन विकासाची बांधीलकी असणाऱ्यांनाच निवडून द्या - देविदास देसाई

बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गटातटाचे राजकारण व व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या मनोवृत्तीला कायमचा पायबंद घालून गावाचा विकास साधण्यासाठी या निवडणुकीत गावच्या विकासाची बांधीलकी असणाऱ्या व्यक्तिंचीच निवड करा असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे. 

       प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की , बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली तशी नेते मंडळीची धावपळ सुरु झाली नेत्या बरोबरच कार्यकर्तेही पहाटे पासुनच कामाला लागले आहेत. कोण कुठे बसतो , कुणाकडे जातो , कोण कोणत्या गृपला मदत करणार , याची टेहळणी सुरु झालेली आहे. गुप्त बैठकांना ऊत आलाय. प्रत्येक जण गुडघ्याला बांशिग बांधुन तयार आहे. जुन्या पेक्षा नविनच लई जोरात आहेत ! निवडणूक सुरु झाली की बैठका पार्ट्यावर उधळपट्टी होणारच ! मग निवडणूकीत ओतलेला नव्हे गुतंवणूक केलेले भांडवल वसुलीसाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जातील , त्या करीता मतदारांनो जागे व्हा ! आजची संधी पुन्हा पाच वर्षा नंतरच ! त्यामुळे गाव कारभारी निवडताना योग्य व्यक्तीची निवड करा , जो गावाची आजची दशा बदलुन गावाला योग्या दिशा देवू शकेल नाही तर काही लोक निवडून येतात , परंतु त्यांना गावासाठी वेळच नसतो ! साधे ग्रामसभेलाही त्या सदस्यांना उपस्थित राहण्यास वेळ नसतो ! 

     आपल्या वार्डातील सदस्याने आपल्या वार्डातील समस्या पोटतिडकीने सोडविल्या पाहीजे असा सदस्य निवडा.पाच वर्ष आपल्या अडचणी सुटेल असेच सदस्य निवडा सर्व नेते मंडळींना व गाव पुढार्यांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र बसुन गावाच्या विकासा करीता एक होवून ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी मनापासुन प्रयत्न  करा. असे आवाहनही पत्रकार देसाई यांनी केले आहे.


दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व  दोनआरोपी ताब्यात.

आज दि.  16/ 12/2020 रोजी मा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो अहमदनगर यांना  बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग  येथे मालक  नामे प्रवीण बाळासाहेब पानसंबळ  हा   महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे    मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा.  डॉक्टर दिपाली काळे  अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे Dy.s.pसंदिप मिटके   Dy.s.p  संजय सातव, श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल  यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ   रा निर्मळ पिंपरी ता राहता 2) अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Dy.s.p.संदिप मिटके,Dy.s.p  संजय सातव,आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस API समाधान पाटील यांच्या पथकाची कारवाई.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावात एम आय एमची शाखा सुरु करण्यात आली असुन बेलापुर शहराध्यक्ष म्हणून मोहसीन ख्वाजा शेख यांची तर उपाध्यक्ष पदी निसार शाह यांची निवड करण्यात आली             एम आय एमचे तालुकाध्यक्ष शकील शेख श्रीरामपुर शहराध्यक्ष युनुस शेख  मोहसीन सय्यद जावेद शेख  आरपीआयचे शहराध्यक्ष रमेश आमोलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पत्रकार देविदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  ही निवड करण्यात आली नुतन अध्यक्ष मोहसीन शेख यांनी या पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले या वेळी मान्यवरांच्या हस्ते एम आय एम संघटनेच्या फलकाचेही अनावरण करण्यात आले  बेलापुर कार्यकारीणी सदस्य म्हणून जुबेर तांबोळी कलीम सय्यद मोईन शेख शब्बीर शाह अझरोद्दीन शेख आरिफ शेख मन्सुर शेख समीर शेख हाजी मोईन शेख आयाज सय्यद यांचा समावेश करण्यात आला या वेळी अमोल रुपटक्के किरण बोधक शाकीर शेख ख्वाजा भाई शाहरुख सय्यद तौफीक शेख टिनमेकरवाले आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक मन्सुर हाजी यांनी केले सूत्रसंचलन आयाज सय्यद यांनी केले तर मोहसीन ख्वाजा शेख यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजल्या नंतर गावात बैठकीना ऊत आला आहे दिवसा बरोबर सायंकाळच्या  बैठकाही सुरु झाल्या आहेत त्यामुळे गल्ली गल्लीत आपला सदस्य कोण यावर मंथन सुरु आहे.बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असुन सहा प्रभाग मधुन १७ जागेकरीता ही निवडणूक होणार आहे या निवडणूकीत जुना- नवा हा नविनच वाद उफाळून येणार असुन पक्ष श्रेष्ठीपुढे ही मोठी डोके दुखी ठरणार आहे अनेक तरुण कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत या निवडणूकीत जि प सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांचा समोरा समोर सामना होण्याची दाट शक्यता आहे सुधीर नवले यांनी श्रीरामपुर येथील एका नेत्याच्या उपस्थितीत जनता अघाडीचे नेते रविंद्र  खटोड काँग्रेसचे नेते अरुण पा नाईक यांची एकत्रीत बैठक होवुन जागा वाटपाबाबत निर्णय झाला असला तरी सरपंच  पदाबाबत अजुनही एकमत झालेले नाही जि प सदस्य शरद नवले हे अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे तसेच भाजपाच्या कार्याकर्त्यांना बरोबर घेवुन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे सुधीर नवले यांच्याकडे ईच्छूकांचा भरणा अधिक असुन माजी सदस्य पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत तर नविन पिढीला हे मान्य नाही मागील निवडणूकीत पदे मिळविलेल्या सदस्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असे नविन पिढीचे मत आहे परंतु जुनी मंडळी पुन्हा गुडघ्याला बाशिंग बाधुन तयार आहे या वादातुनच तिसरी अघाडी होण्याची दाट शक्यता आहे ही निवडणूक लढविताना एक गट मागील केलेल्या कामाचे भांडवल करुन जनतेकडे मते मागणार आहे तर दुसरा गट त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडून मते मागणार आहे तर तिसरी होणारी अघाडी हे सर्व कसे चुकीचे आहे हे जनतेला पटवुन मतांची मागणी करणार आहे या निवडणूकीत सुनिल मुथा भाजपाचे प्रफुल्ल डावरे आजय डाकले काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते परंतु कायम डावललेले कैलास चायल  गोपाल जोशी भास्करराव खंडागळे यांची भुमीका महत्वाची ठरणार आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-- जैन भजन गंगा म्यूजीकल गृप मध्य प्रदेश यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल  भारतीय आँनलाईन गायन स्पर्धेत डाँ .रविंद्र गंगवाल यांना स्विट व्हाँईस अँवार्डने गौरविण्यात आले   आहे.मध्य प्रदेश मधील जैन भजन गंगा म्यूजिकल गृप छिंदवाडा यांच्या वतीने गीत गाता चल २०२०  या अखिल भारतीय आँनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत आँनलाईन सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत बेलापुर येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बेलापुर डाँक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष  डाँ, रविंद्र गंगवाल यांनी जेबीजी स्विट व्हाईस अँवार्ड मिळविले या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डायरेक्टर व गायक राजेश जैन अंतरराष्ट्रीय गायक डाँ. गौरव व दिपक्षीखा  जैन साधना मंदावत इंदोर फिल्म प्रोड्युसर राजेंद्र बैद जयपुर गायक सारीका जैन छिंदवाडा यांनी काम पाहीले या पूर्वीही डाँ, गंगवाल यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेवुन पहीला दुसरा असे बक्षिस मिळविलेले आहेत डाँ, रविंद्र गंगवाल यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून अनेक छंद जोपासले आहेत  त्यांना लिखाण व वाचनाची मोठी आवड आहे त्यांच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई  ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा जि प सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड बाजार समितिचे संचालक सुधीर नवले बेलापुर मेडिकल  असोसिएशनचे अध्यक्ष  डॉ  अविनाश गायकवाड़  कैलास चायल यांनीही अभिनंदन  केले आहे


बेलापुर  ( देविदास देसाई  )- श्रीरामपुर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन सोमवार दिनांक  १४ डिसेंबर रोजी निघणारी सरपंच  पदाची सोडत स्थगित करण्यात आली आहे  आता ग्रामपंचायत निवडणूक मतदाना नंतर सरपंच पदाच आरक्षण  निघणार असल्यामुळे निवडणूकीला आता खरंच रंगत चढणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केलेल्या आदेशात निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे नमुद केले असुन निवडणूक नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक १५ डिसेंबर  २०२० आहे तर नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर  २०२० नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक ४ जानेवारी  ३ वाजेपर्यंत  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेद्वारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक ४ जानेवारी २०२१ ३ वाजे नंतर  मतदान दिनांक १५ जानेवारी २०२१ सकाळी ७.३० ते ५.३० मतमोजणी दिनांक  १८ जानेवारी  २०२१ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २१ जानेवारी २०२१ असा जाहीर करण्यात आला आहे १४ जानेवारी रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत होती परंतु  नविन आदेशानुसार आता निवडणूक निकाला नंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तसे आदेश महसुल कार्यालया मार्फत जारी करण्यात आले आहे महसुल कार्यालयाच्या वतीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की ज्या ग्रामपंचायत सरपंच  पदाचे आरक्षण सोडत बाकी आसल्यास सरद कार्यक्रम हा सांदर्भिय राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल २०२०ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या व ते नव्याने स्थापित होणार्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्याक्रमाच्या  मतदाना नंतर  म्हणजे १५ जानेवारी २०२१ नंतर आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात यावा असे त्या आदेशात म्हटले आहे.

बेलापुर   ( प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असुन सोमवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार असल्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. श्रीरामपुर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असुन गावोगाव मोर्चे बांधणीस सुरुवात झाली आहे मतदार याद्यांच्या हरकती पार पडल्या नतर आता सोमवारी तहसील कार्यालय नविन प्रशासकीय इमारत या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे या सोडती नंतर उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत ५० टक्के महीला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे त्यामुळे जि प सदस्य  पचांयत समिती  सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदिंनी सोमवारी उपस्थित रहावे असे अवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे                                ग्रामपंचायत निवडणूकामुळे ग्रामीण भागात प्रभाग निहाय उमेदवार निवडण्यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत कुणी कुणा सोबत युती करावी हे ही तपासुन पाहीले जात आहे मागील काही काळात घडलेल्या राजकीय  नाट्यमय घडामोडीमुळे आता ग्रामीण भागातही कार्यकर्ते आपापल्या सोयी नुसार निवडणूक लढविण्यास ईच्छूक आहेत आता तरुण कार्यकर्ते निवडणूक लढण्यास तयार आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शेती असलेल्या क्षेत्रात  परवाना न घेता  बांधकाम करणार्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बेलापुर शहरा लगत असलेल्या श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर नुकतीच उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पहाणी केल्यानंतर मंडलाधिकारी व कामगार तलाठी  यांना तशा सुचना देण्यात आलेल्या आहेत                                           अहमदनगर येथील बैठक आटोपुन परतत असताना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर श्रीरामपुर रस्त्यावर असणार्या व्यवसायीकांची माहीती घेतली त्या करीता त्यांनी आपले सरकारी वाहन दुरच ठेवुन या सर्व भागाची पायीच पहाणी केली त्या वेळी अनेक ठिकाणी बिन शेती न करता तसेच बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केल्याचे आढळून आले त्यांनी तातडीने मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व कामगार तलाठी कैलास खाडे यांना सुचना देवुन अशा प्रकारे बिन शेती नसलेल्या  व विना परवाना बांधकाम करणार्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असे विना परवानगी बिन शेती व अनाधिकृत बांधकाम  आसणार्या व्यवसायीकांचा शोध घेवुन दंडात्मक कार्यवाही करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी  व कामगार तलाठी कैलास खाडे  यांनी सांगीतले महसुलच्या या कारवाईमुळे व्यवसायीकामध्ये खळबळ उडाली आहे लाँक डाऊन काळात व्यवसाय बंद असणार्या व्यापार्यांना हा मोठा भूर्दंडबसणार आहे

श्रीरामपूर तालुक्यातील विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या मातोश्री, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांचे दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमारास, वृद्धापकाळाने निधन झालय, निधना वेळी त्यांचे वय ८५ वर्ष होते, जयंतराव ससाणे यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत, स्वर्गीय रत्नमाला ससाणे यांचा मोलाचा वाटा होता, त्या सुनील ससाणे यांच्या मातोश्री व उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे, यांच्या आजी होत्या. आपल्या मनमिळावू स्वभाव तसेच प्रत्येकाशी त्याचे वैयक्तिक संबंध होते, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या जाण्याने, तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुयोग मंगल कार्यालय याठिकाणी आले होते, सायंकाळी श्रीरामपूर येथील अमरधाम या ठिकाणी , श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ,३ सुना, ४ नातवंड, असा मोठा परिवार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीचे साडे तीन लाख रुपयाचे सामान चोरीस गेले असुन या गंभीर घटनेस आठ दिवस उलटून गेले तरी तेरी भी चुप मेरी भी चुप असाच काहीसा प्रकार या घटने बाबत घडलेला आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे लोखंड पडलेले होते तसेच तेथे पाणी शुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारे टि सी एल पावडर तुरटी आदी सामान पडलेले होते या ठिकाणी देखरेखीसाठी  एका कर्मचार्याची  देखील नेमणूक केली जाते या शिवाय या ठिकाणी सि सि टी व्ही कँमेर्याचा देखील वाँच असतो असे असताना ग्रामपंचायतीच्या मालकीचे साडे तीन लाख रुपये किमतीचे सामान चोरी जाणे म्हणजे विश्वास न बसणारी गोष्ट आहे परंतु  हे घडले आहे अन त्या घटनेस आज आठ दिवस झालेले असुन त्या बाबत ग्रामसेवक राजेंद्र  तगरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बेलापुर पोलीसाकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले तीन साडे तिन लाख रुपयाचे भंगार व इतर साहीत्य चोरीस गेल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला   या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता हवालदार अतुल लोटके व पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी सकाळी फोन आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला या बाबत सखोल माहीती घेतली असता कुंपणच शेत खात असल्याचे बोलले जात असुन गावातील गटबाजीचा फायदा उठवुन काहींनी हा उद्योग केलेला असल्याची चर्चा आहे हे करत असताना त्या महाभागांनी आपले कारनामे कँमेर्यात बंद होवु नये म्हणून आगोदर सि सि टी व्ही  कँमेर्याच्या केबल जाळल्याची चर्चाही चालु आहे  बेलापुर ग्रामपचायतीत प्रशासक असुन गावात मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे त्यातच ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्यामुळे नेते मंडळीही माहीत असताना गप्प आहे या चोरी बाबत बेलापुर पोलीसांनी तपास करुन त्यातील खरे गुन्हेगार समोर आणावे अशी मागणीही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

राहुरी  प्रतिनिधी( मिनाष पटेकर )राष्ट्रवादी काॅग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड,विर लहुजी सेना, संत सावता माळी युवक,भारत मुक्ती मोर्चा, मराठा महासंघ, यशवंत सेना,अदि पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांनी राहुरीचे तहसिलदार  व पोलिस निरिक्षक यांना निवेदन देत राहुरी बंद ठेवणेचे आवाहान केले आहे.

      गेल्या अनेक दिवसापासून पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र वर्तमान भाजपा केंद्र सरकार करत आहे. देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा जाचक कायदा रद्द करावा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य करावी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा याकरिता भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. दिनांक ८ डिसेंबर रोजी होत असलेल्या भारत बंद मध्ये राहुरी तालुका आणि परिसरातील  शेतकरी, शेतमजूर, महिला ,पुरुष तसेच युवकांनी व राजकीय-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व  संघटनांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

       यावेळी डाॅ प्रकाश पवार,दत्ता कवाने,रविद्र आढाव,नंदु तनपुरे,मच्छिद्र गुंड,राहुल शेटे,राजेद्र खोजे,संजय संसारे,कांतीलाल जगधने,सचिन ठुबे ,कांता तनपुरे संदिप आढाव संतोष आघाव दिनेश वराळे ,सुनिल इंगळे,अनिल भट्टड,शंकर धोंडे,दिलीप चौधरी,सुनिल तनपुरे,पांडु उदावंत,संदीप कवाने,अभिजित नरोडे, बिलाल शेख,किशोर येवले, अदि उपस्थित होते.

राहुरी ,(प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी) दि. 7 डिसेंबर, 2020 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आज नामदार श्री. दादाजी भुसे, मा. मंत्री, कृषि आणि माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी विविध प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, कुलगुरु डॉ. अशोक ढवण, राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पवार, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव श्री. मोहन वाघ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री रावसाहेब खेवरे , नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, मा. मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. रफिक नाईकवाडी, श्री. सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवाजी जगताप, विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके यावेळी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री महोदयांनी विद्यापीठातील फॉरेज कॅक्टस प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबु संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, कृषि अवजारे प्रकल्प, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान प्रकल्पास भेट दिली. या भेटी दरम्यान मंत्री म्हणाले विद्यापीठ स्थापन होऊन 52 वर्ष झाले असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान अनेक शेतकर्यांपर्यंत पोहचले आहे. बांबु प्रकल्पास भेट देतांना ते म्हणाले 1995 साली बांबु लागवडीचे मिशन हे शेतकर्यांनी सुरु केले होते. पालघरच्या आदिवाशी भगिनींचे बांबु प्रक्रियेवर चांगले काम केलेले आहे. कृषि अवजारे प्रकल्पाला भेट देतांनी ते म्हणाले विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर कृषि अवजारांची निर्मिती करणे गरजेचे आहे. शासन फळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे पण उत्पादित फळांच्या मुल्यवर्धनावर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदी होतात हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनाने अधोरेखीत केलेले आहे. 

यावेळी विविध प्रकल्पांना भेट देतांना कृषि मंत्र्यांनी प्रक्षेत्रावरील मजुरांशी देखील संवाद साधला. याप्रसंगी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्र प्रकल्पाच्या भेटीच्या वेळी श्री. पोपटराव पवार माहिती देतांना म्हणाले विद्यापीठाच्या 953 हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आदर्शवत असून या प्रकल्पाद्वारे 123 टी.सी.एम. पाण्याची साठवणूक जमिनीत झालेली आहे. या प्रकल्पामुळे या प्रक्षेत्रावर कर्बाचे प्रमाण किती वाढले, मातीची सुपीकता, जमिनीची सुधारणा या संदर्भात अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प देशासाठी आदर्शवत प्रकल्प असून हा संपूर्ण देशात राबविणे गरजेचे आहे. या भेटीच्या वेळी डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ. सचिन नांदगुडे, प्रा. प्रसन्न सुराणा, डॉ. बाबासाहेब सिनारे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विक्रम कड, डॉ. सुमती दिघे, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. अनिल काळे, प्रा. मंजाबापू गावडे आणि डॉ. अशोक वाळूंज यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget