पोलिसांनी थांबवलेल्या कारमध्ये चार धारदार तलवारी,एलसीबी पथकाने केली कारवाई.

अहमदनगर- नगर शहरातील दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौकात पोलिसांनी थांबवलेल्या मोटारीत चार धारदार तलवारी सापडल्या. मोटारीतील ड्रायव्हर सीटच्या मागे पांढऱ्या गोणीत या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पकडण्यात आलेल्याचे नाव अशोक बाळासाहेब राळभाते (रा.रत्नापूर, ता.जामखेड) आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई एलसीबी पथकाने केली.
याबाबतची माहिती अशी की, पो.हेकॉ संदीप घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती कि, अशोक राळेभात (रा. रत्नापूर, ता.जामखेड) हा त्याचे ताब्यातील चारचाकी मोटारीतून चार तलवारी घेवून दिल्ली गेटकडून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणार असल्याची ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी नीलक्रांती चौकात फौजफाटा तैनात केला होता व ही गाडी आल्यावर पंचांसमक्ष तिची झडती घेतली. कारमध्ये ड्रायव्हर सीटचे पाठीमागील बाजूस एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये ३ हजार ८०० रुपये किमतीच्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. या तलवारींबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती सांगितली नाही. त्यामुळे या तलवारी व तसेच ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget