सर्व नेते मंडळींनी गट तट विसरुन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे जि प सदस्य शरद नवले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत स्थापनेला शभंर वर्ष पुर्ण होत असुन गावात निवडणूक निमित्ताने होणारी कटुता पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व गावचा । विकास होण्यासाठी बेलापुर पत्रकार  संघाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेला पुढाकार योग्य असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले आहे           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावाची लोकसंख्या २५ हजार असुन १४ हजार मतदार आहेत या सर्व लोकाच्या हिताचे निर्णय घेणारे काही ठराविकच लोक आहेत गावाच्या हिताचे निर्णय घेणार्या पुढार्यांनी गाव हे केंद्रस्थानी ठेवुन ही निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी मनापासुन सहकार्य करावे गावातील अनेक नागरीकांचीही तशीच इच्छा आहे सर्व नेते मंडळींना विनंती आहे की  गाव महत्वाचे की नाव हे आपणच ठरवायचे आहे बेलापुर पत्रकार संघाने गावांच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असुन सर्वांनी गट तट मतभेत बाजुला ठेवुन गावचा ईतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहीजे सर्वांनी मनावर घेतले तर काहीच  अवघड नाही तसेच कुणावरही दबाव न आणता आपण ही निवडणूक बिनविरोध करावी गावासाठी सर्वांनी दोन पावले मागे यावे आपणाला तालुका जिल्हा पातळीवर कारखाना बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद अशा इतर निवडणूका आहेत गावात सलोख्याचे चांगले वातावरण ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून गावच्या विकासाचा एक कृती आराखडा ठरवुन काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही काल काय झाले कुणी काय केले  हे सर्व मतभेद विसरुन स्वच्छ मनाने उद्याच्या सुंस्कृत  बेलापुर गावाकरीता एकत्र होवुन गावची निवडणूक बिनविरोध करु या असेही जि प सदर शरद नवले यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget