बेलापुर(वार्ताहर)गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कोनाचीही गय केली जाणार नाही, असा ईशारा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेलापुर पोलीस चौकीत विविध पक्षांचे स्थानिक प्रमुख, पत्रकार व ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ते सोडून जर कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर ताबडतोब पोलीसांना कळवा आम्ही त्यांच्यावर कोणताही पक्षपात न करता त्वरित गुन्हे दाखल करु असेही नोपानी यांनी यावेळी आश्वाशीत केले.*या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा द्वारकनाथ बडधे प्रा अशोक बडधे आदिंनी मनोगत व्याक्त केले या बैठकीला सर्वश्री ,रविंद्र खटोड ,पोलीस पाटील अशोक प्रधान, अशोक प्रधान,युवराज जोशी,कैलास चायल, अशोक पवार, जावेद शेख, अकबर सय्यद,प्रा. अशोक बडधे,अजय डाकले, द्वारकानाथ बडधे, पत्रकार ज्ञानेश गवले, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, अशोक शेलार,यांच्यासह पो. हे. कॉ. अतुल लोटके, रामेश्वर ढोकने, निखिल तमनर, हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment