सांगली - आटपाडी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक करत चोरलेला बोकड हस्तगत केले आहे. यानंतर बोकडाच्या मालकांनी पोलिसांचा सत्कार करत गावातून बोकडाची मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे. दीड कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सोमनाथ जाधव यांच्या या महागड्या बकऱ्याची हाय प्रोफाईल पद्धतीने एका आलिशान गाडीतून चोरी झाल्याचे समोर आले होते.
या घटनेमुळे आटपाडी नव्हेचं तर सांगली जिल्ह्यातील खळबळ उडाली होती. महागड्या बोकडाची झालेल्या चोरीमुळे बोकड मालका सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात बोकड चोरीचा गुन्हा दाखल केले होता. 16 लाखांचा बोकड चोरीच्या घटनेमुळे आटपाडी पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास सुरू केला होता. आणि तपास सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका संशयित गाडीतून बकरा घेऊन काही जण आल्याची माहिती मिळाली आणि विटा पोलिसांनी यावेळी तिघा संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असणारे बोकड ताब्यात घेतल आहे.
आटपाडी पोलिसांनी चोरीला गेलेला बोकड शोधून काढण्याची माहिती मिळताच सोमनाथ जाधव आणि आटपाडी येथील ग्रामस्थ हे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जमले आणि चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचा सत्कार करत, आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आटपाडी शहरातून 16 लाखांच्या बोकडाची जंगी मिरवणूक काढली.
Post a Comment