राहुरी प्रतिनिधी( मिनाष पटेकर )राष्ट्रवादी काॅग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड,विर लहुजी सेना, संत सावता माळी युवक,भारत मुक्ती मोर्चा, मराठा महासंघ, यशवंत सेना,अदि पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांनी राहुरीचे तहसिलदार व पोलिस निरिक्षक यांना निवेदन देत राहुरी बंद ठेवणेचे आवाहान केले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र वर्तमान भाजपा केंद्र सरकार करत आहे. देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा जाचक कायदा रद्द करावा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य करावी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा याकरिता भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. दिनांक ८ डिसेंबर रोजी होत असलेल्या भारत बंद मध्ये राहुरी तालुका आणि परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला ,पुरुष तसेच युवकांनी व राजकीय-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी डाॅ प्रकाश पवार,दत्ता कवाने,रविद्र आढाव,नंदु तनपुरे,मच्छिद्र गुंड,राहुल शेटे,राजेद्र खोजे,संजय संसारे,कांतीलाल जगधने,सचिन ठुबे ,कांता तनपुरे संदिप आढाव संतोष आघाव दिनेश वराळे ,सुनिल इंगळे,अनिल भट्टड,शंकर धोंडे,दिलीप चौधरी,सुनिल तनपुरे,पांडु उदावंत,संदीप कवाने,अभिजित नरोडे, बिलाल शेख,किशोर येवले, अदि उपस्थित होते.
Post a Comment