बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर ग्रामपंचायतीचे साडे तीन लाख रुपयाचे सामान चोरीस गेले असुन या गंभीर घटनेस आठ दिवस उलटून गेले तरी तेरी भी चुप मेरी भी चुप असाच काहीसा प्रकार या घटने बाबत घडलेला आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे लोखंड पडलेले होते तसेच तेथे पाणी शुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारे टि सी एल पावडर तुरटी आदी सामान पडलेले होते या ठिकाणी देखरेखीसाठी एका कर्मचार्याची देखील नेमणूक केली जाते या शिवाय या ठिकाणी सि सि टी व्ही कँमेर्याचा देखील वाँच असतो असे असताना ग्रामपंचायतीच्या मालकीचे साडे तीन लाख रुपये किमतीचे सामान चोरी जाणे म्हणजे विश्वास न बसणारी गोष्ट आहे परंतु हे घडले आहे अन त्या घटनेस आज आठ दिवस झालेले असुन त्या बाबत ग्रामसेवक राजेंद्र तगरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बेलापुर पोलीसाकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले तीन साडे तिन लाख रुपयाचे भंगार व इतर साहीत्य चोरीस गेल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता हवालदार अतुल लोटके व पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी सकाळी फोन आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला या बाबत सखोल माहीती घेतली असता कुंपणच शेत खात असल्याचे बोलले जात असुन गावातील गटबाजीचा फायदा उठवुन काहींनी हा उद्योग केलेला असल्याची चर्चा आहे हे करत असताना त्या महाभागांनी आपले कारनामे कँमेर्यात बंद होवु नये म्हणून आगोदर सि सि टी व्ही कँमेर्याच्या केबल जाळल्याची चर्चाही चालु आहे बेलापुर ग्रामपचायतीत प्रशासक असुन गावात मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे त्यातच ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्यामुळे नेते मंडळीही माहीत असताना गप्प आहे या चोरी बाबत बेलापुर पोलीसांनी तपास करुन त्यातील खरे गुन्हेगार समोर आणावे अशी मागणीही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Post a Comment