बेलापुर (प्रतिनिधी )-- जैन भजन गंगा म्यूजीकल गृप मध्य प्रदेश यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आँनलाईन गायन स्पर्धेत डाँ .रविंद्र गंगवाल यांना स्विट व्हाँईस अँवार्डने गौरविण्यात आले आहे.मध्य प्रदेश मधील जैन भजन गंगा म्यूजिकल गृप छिंदवाडा यांच्या वतीने गीत गाता चल २०२० या अखिल भारतीय आँनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत आँनलाईन सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत बेलापुर येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बेलापुर डाँक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डाँ, रविंद्र गंगवाल यांनी जेबीजी स्विट व्हाईस अँवार्ड मिळविले या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डायरेक्टर व गायक राजेश जैन अंतरराष्ट्रीय गायक डाँ. गौरव व दिपक्षीखा जैन साधना मंदावत इंदोर फिल्म प्रोड्युसर राजेंद्र बैद जयपुर गायक सारीका जैन छिंदवाडा यांनी काम पाहीले या पूर्वीही डाँ, गंगवाल यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेवुन पहीला दुसरा असे बक्षिस मिळविलेले आहेत डाँ, रविंद्र गंगवाल यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून अनेक छंद जोपासले आहेत त्यांना लिखाण व वाचनाची मोठी आवड आहे त्यांच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा जि प सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड बाजार समितिचे संचालक सुधीर नवले बेलापुर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अविनाश गायकवाड़ कैलास चायल यांनीही अभिनंदन केले आहे
Post a Comment