तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर सरपंच पद आरक्षण आता मतदाना नंतरच सोमवारचे आरक्षण कार्यक्रम स्थगीत.

बेलापुर  ( देविदास देसाई  )- श्रीरामपुर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन सोमवार दिनांक  १४ डिसेंबर रोजी निघणारी सरपंच  पदाची सोडत स्थगित करण्यात आली आहे  आता ग्रामपंचायत निवडणूक मतदाना नंतर सरपंच पदाच आरक्षण  निघणार असल्यामुळे निवडणूकीला आता खरंच रंगत चढणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केलेल्या आदेशात निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे नमुद केले असुन निवडणूक नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक १५ डिसेंबर  २०२० आहे तर नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर  २०२० नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक ४ जानेवारी  ३ वाजेपर्यंत  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेद्वारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक ४ जानेवारी २०२१ ३ वाजे नंतर  मतदान दिनांक १५ जानेवारी २०२१ सकाळी ७.३० ते ५.३० मतमोजणी दिनांक  १८ जानेवारी  २०२१ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २१ जानेवारी २०२१ असा जाहीर करण्यात आला आहे १४ जानेवारी रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत होती परंतु  नविन आदेशानुसार आता निवडणूक निकाला नंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तसे आदेश महसुल कार्यालया मार्फत जारी करण्यात आले आहे महसुल कार्यालयाच्या वतीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की ज्या ग्रामपंचायत सरपंच  पदाचे आरक्षण सोडत बाकी आसल्यास सरद कार्यक्रम हा सांदर्भिय राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल २०२०ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या व ते नव्याने स्थापित होणार्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्याक्रमाच्या  मतदाना नंतर  म्हणजे १५ जानेवारी २०२१ नंतर आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात यावा असे त्या आदेशात म्हटले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget