बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीत जुना-नवा वाद ठरणार पक्ष श्रेष्ठीची डोकेदुखी तिरंगी लढत रंगणार.
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजल्या नंतर गावात बैठकीना ऊत आला आहे दिवसा बरोबर सायंकाळच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत त्यामुळे गल्ली गल्लीत आपला सदस्य कोण यावर मंथन सुरु आहे.बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असुन सहा प्रभाग मधुन १७ जागेकरीता ही निवडणूक होणार आहे या निवडणूकीत जुना- नवा हा नविनच वाद उफाळून येणार असुन पक्ष श्रेष्ठीपुढे ही मोठी डोके दुखी ठरणार आहे अनेक तरुण कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत या निवडणूकीत जि प सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांचा समोरा समोर सामना होण्याची दाट शक्यता आहे सुधीर नवले यांनी श्रीरामपुर येथील एका नेत्याच्या उपस्थितीत जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड काँग्रेसचे नेते अरुण पा नाईक यांची एकत्रीत बैठक होवुन जागा वाटपाबाबत निर्णय झाला असला तरी सरपंच पदाबाबत अजुनही एकमत झालेले नाही जि प सदस्य शरद नवले हे अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे तसेच भाजपाच्या कार्याकर्त्यांना बरोबर घेवुन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे सुधीर नवले यांच्याकडे ईच्छूकांचा भरणा अधिक असुन माजी सदस्य पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत तर नविन पिढीला हे मान्य नाही मागील निवडणूकीत पदे मिळविलेल्या सदस्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असे नविन पिढीचे मत आहे परंतु जुनी मंडळी पुन्हा गुडघ्याला बाशिंग बाधुन तयार आहे या वादातुनच तिसरी अघाडी होण्याची दाट शक्यता आहे ही निवडणूक लढविताना एक गट मागील केलेल्या कामाचे भांडवल करुन जनतेकडे मते मागणार आहे तर दुसरा गट त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडून मते मागणार आहे तर तिसरी होणारी अघाडी हे सर्व कसे चुकीचे आहे हे जनतेला पटवुन मतांची मागणी करणार आहे या निवडणूकीत सुनिल मुथा भाजपाचे प्रफुल्ल डावरे आजय डाकले काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते परंतु कायम डावललेले कैलास चायल गोपाल जोशी भास्करराव खंडागळे यांची भुमीका महत्वाची ठरणार आहे
Post a Comment