बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर गावात एम आय एमची शाखा सुरु करण्यात आली असुन बेलापुर शहराध्यक्ष म्हणून मोहसीन ख्वाजा शेख यांची तर उपाध्यक्ष पदी निसार शाह यांची निवड करण्यात आली एम आय एमचे तालुकाध्यक्ष शकील शेख श्रीरामपुर शहराध्यक्ष युनुस शेख मोहसीन सय्यद जावेद शेख आरपीआयचे शहराध्यक्ष रमेश आमोलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पत्रकार देविदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली नुतन अध्यक्ष मोहसीन शेख यांनी या पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले या वेळी मान्यवरांच्या हस्ते एम आय एम संघटनेच्या फलकाचेही अनावरण करण्यात आले बेलापुर कार्यकारीणी सदस्य म्हणून जुबेर तांबोळी कलीम सय्यद मोईन शेख शब्बीर शाह अझरोद्दीन शेख आरिफ शेख मन्सुर शेख समीर शेख हाजी मोईन शेख आयाज सय्यद यांचा समावेश करण्यात आला या वेळी अमोल रुपटक्के किरण बोधक शाकीर शेख ख्वाजा भाई शाहरुख सय्यद तौफीक शेख टिनमेकरवाले आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक मन्सुर हाजी यांनी केले सूत्रसंचलन आयाज सय्यद यांनी केले तर मोहसीन ख्वाजा शेख यांनी आभार मानले.
Post a Comment