जितेश लोकचंदानी यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या या मागणी पत्र पुढे म्हटले आहे की, इंदौर येथील सोनी परिवार शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता ,दि, १० /८/२०१७रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता व नंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती, तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही मिळुन आली नाही , हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे ,असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे ,
याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन १७तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे ,या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे ,याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, शिर्डी शहरात मानवी तस्करी होते ,याबाबत मोठा गाजावाजा झाला होता , शिर्डीतून महिलांच्या पोरं होते अशी मोठी चर्चा राज्य झाली होती त्यामुळे शिर्डी चे नाव मोठे बदनाम झाले होते त्यामुळे आर्थिक उलाढालीवर शिर्डीत फटका बसला होता ,आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर. आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे दीप्ती मनोज सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे ,हे खरे बोलतात की खोटे बोलतात, हे संपूर्ण नागरिकांना, साईभक्तांना कळणे गरजेचे आहे ,ही महिला बेपत्ता होते व इंदोर मध्ये स्वतःच्या शहरात सापडते, या पाठीमागे कोण आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते म्हणून बदनाम केल्यामुळे मनोज सोनी व ,दिप्ती सोनी यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,अशी मागणी साई भक्तांच्या वतीने जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असून या दोघांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे,
Post a Comment