बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुरातील भांड गल्ली व काळे गल्ली येथील सार्वजनिक रस्ता बंद केल्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत असुन हा रस्ता खुला करावा अशी मागणी अन्सार बाबनभाई तांबोळी यांनी केली आहे. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात अन्सार तांबोळी यांनी पुढे म्हाटले आहे की काळे गल्लीत राहाणार्या ४० ते ५० कुटुबांचा अनेक वर्षापासून या रस्त्यावरुन वावर होता परंतु येथील एका व्यक्तीने ती शासकीय जागा आपल्या मालकीची आहे असे समजुन नागरीकांचा नेहमीचा रस्ता दगड माती लाकडे ओंडके टाकुन बंद करण्याचा प्रयत्न केला आहे या बाबत अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करुन देखील काहीच उपयोग झाला नाही या भागात राहणार्या ४० ते ५० कुटुंबाला हा रस्ता अडविल्यामुळे वहातुकीसा व ये जा करताना त्रास होत असुन काही अघटीत घडल्यास रुग्णवाहीका अथवा अग्नीशामक दलाची गाडी येणेच मुश्कील आहे त्यामुळे तातडीने हा रस्ता नागरीकासाठी खुला करुन द्यावा अशी मागणी तांबोळी यांनी केली असुन आमच्या निवेदनावर कार्यवाही झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही तांबोळी यांनी दिला आहे.
Post a Comment