बेलापुर (प्रतिनिधी )- शेती असलेल्या क्षेत्रात परवाना न घेता बांधकाम करणार्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बेलापुर शहरा लगत असलेल्या श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर नुकतीच उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पहाणी केल्यानंतर मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना तशा सुचना देण्यात आलेल्या आहेत अहमदनगर येथील बैठक आटोपुन परतत असताना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर श्रीरामपुर रस्त्यावर असणार्या व्यवसायीकांची माहीती घेतली त्या करीता त्यांनी आपले सरकारी वाहन दुरच ठेवुन या सर्व भागाची पायीच पहाणी केली त्या वेळी अनेक ठिकाणी बिन शेती न करता तसेच बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केल्याचे आढळून आले त्यांनी तातडीने मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व कामगार तलाठी कैलास खाडे यांना सुचना देवुन अशा प्रकारे बिन शेती नसलेल्या व विना परवाना बांधकाम करणार्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असे विना परवानगी बिन शेती व अनाधिकृत बांधकाम आसणार्या व्यवसायीकांचा शोध घेवुन दंडात्मक कार्यवाही करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व कामगार तलाठी कैलास खाडे यांनी सांगीतले महसुलच्या या कारवाईमुळे व्यवसायीकामध्ये खळबळ उडाली आहे लाँक डाऊन काळात व्यवसाय बंद असणार्या व्यापार्यांना हा मोठा भूर्दंडबसणार आहे
Post a Comment