बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गटातटाचे राजकारण व व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या मनोवृत्तीला कायमचा पायबंद घालून गावाचा विकास साधण्यासाठी या निवडणुकीत गावच्या विकासाची बांधीलकी असणाऱ्या व्यक्तिंचीच निवड करा असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की , बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली तशी नेते मंडळीची धावपळ सुरु झाली नेत्या बरोबरच कार्यकर्तेही पहाटे पासुनच कामाला लागले आहेत. कोण कुठे बसतो , कुणाकडे जातो , कोण कोणत्या गृपला मदत करणार , याची टेहळणी सुरु झालेली आहे. गुप्त बैठकांना ऊत आलाय. प्रत्येक जण गुडघ्याला बांशिग बांधुन तयार आहे. जुन्या पेक्षा नविनच लई जोरात आहेत ! निवडणूक सुरु झाली की बैठका पार्ट्यावर उधळपट्टी होणारच ! मग निवडणूकीत ओतलेला नव्हे गुतंवणूक केलेले भांडवल वसुलीसाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जातील , त्या करीता मतदारांनो जागे व्हा ! आजची संधी पुन्हा पाच वर्षा नंतरच ! त्यामुळे गाव कारभारी निवडताना योग्य व्यक्तीची निवड करा , जो गावाची आजची दशा बदलुन गावाला योग्या दिशा देवू शकेल नाही तर काही लोक निवडून येतात , परंतु त्यांना गावासाठी वेळच नसतो ! साधे ग्रामसभेलाही त्या सदस्यांना उपस्थित राहण्यास वेळ नसतो !
आपल्या वार्डातील सदस्याने आपल्या वार्डातील समस्या पोटतिडकीने सोडविल्या पाहीजे असा सदस्य निवडा.पाच वर्ष आपल्या अडचणी सुटेल असेच सदस्य निवडा सर्व नेते मंडळींना व गाव पुढार्यांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र बसुन गावाच्या विकासा करीता एक होवून ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी मनापासुन प्रयत्न करा. असे आवाहनही पत्रकार देसाई यांनी केले आहे.
Post a Comment