August 2020

अहमदनगर : कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवा-यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.नगरचा मोहरम देशात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सवारी विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनीही सर्व नियमांचे पालन करीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले. कोठला येथील बारे इमाम (छोटे इमाम) आणि हवेली येथील बडे इमाम यांच्या सवा-यांची स्थापना झाली त्या जागेवरच मिरवणूक काढून जागेवरच विसर्जन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवा-यांचे विसर्जन करण्यात आले.   पोलीस दलाने कोठला आणि हवेलीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विसर्जन झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- जैन युवा महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या आखिल भारतीय भजन स्पर्धेत बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळविला खुल्या गटात प्रथम क्रमांक आग्रा येथील उन्नती जैन यांनी मिळवीला द्वितीय क्रमांक ओडीसा येथील मेघा जैन व जालना येथील दिपाली शहुजी यांना विभागुन देण्यात आला तरा तृतीय क्रमांक बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी मिळविला  छोट्या गटात प्रथम क्रमांक नांदगाव येथील आर्या कासलीवाल यांनी मिळविला द्वितीय क्रमांक शिलाँंग येथील चहक जैन तर तृतीय क्रमांक नाशिक येथील युग जैन यांनी मिळविला डाँक्टर  गंगवाल यांनी मिळविलेल्या विशेष पुरस्काराबद्दल जि प सदस्य  शरद नवले बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे देविदास देसाई  बाजार समितीचे संचालक सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके दिलीप काळे आदिंनी  अभिनंदन  केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी  )- एके काळी जिवंत देखाव्यासाठी  जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या बेलापूर गावातील जय श्रीराम गृपने   बसविलेल्या गणपती बाप्पा समोर पोलीस व डाँक्टर यांच्या प्रतिकृती तयार करुन कोरोनाचे संदेश देणारे फलक लावल्यामुळे मंडळाचा गणपती बाप्पा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.बेलापूरातील जय श्रीराम गृपच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली दर वर्षी पेक्षा या वर्षीचा गणेशोत्सव कोरोनामुळे शांततेत साजरा करावा लागला असे असले तरी सौ नम्रता जितेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतुन जय श्रीराम गृप या मंडळाने कोरोना बाबत वेगवेगळे संदेश समाजा पर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे  कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस दादा तसेच वैद्यकीय सेवा देणारे डाँक्टर याच्या प्रतिकृती तयार करुन त्याच्या कामाविषयी कृतघ्नता व्यक्त करण्यात आली आहे  तसेच  फलकाद्वारे वेगवेगळे जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहे या संदेशात आम्ही बेलापूरकर देणार प्रशासनाला साथ ,करु कोरोनावर यशस्वी मात ,घाबरु नका पण जागृक रहा स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेवा ,आरोग्य हीच खरी संपत्ती, तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित  मास्क वापरा कोरोनाला हटवा सँनिटायझरचा वापर करा सुरक्षित अंतर ठेवा असे संदेश फलकावर लिहुन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे सौ नम्रता वर्मा यांना मंडळाचे अक्षय  ओहोळ श्रेयस गांधी अक्षय लढ्ढा ऋषीकेश सराफ निरज राठी ऋषीकेश मुंदडा स्वप्निल ओहोळ यश वर्मा अशुतोष थोरात कौस्तुभ कुलकर्णी  धिरज सुर्यवंशी आकाश वांढेकर आदित्य कोळसे हितेश बोरुडे जितेद्र वर्मा मंगेश आदिंनी  सहकार्य केले.

🔹धास्तावलेल्या ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..
बुलडाणा - 27 ऑगस्ट
तालुक्यातील देऊळघाट येथील 60 वर्षीय इसमाला श्वासनाचा त्रास होत असल्याने 4 दिवसापूर्वी  बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता व्यक्त होत असतांना, त्यांचा स्वॅब रिपोर्ट आज 27 ऑगस्टला निगेटिव्ह आला असून धास्तवलेल्या परिवारासह गावकरी व प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यक बहुल गावापैकी एक देऊळघाट आहे.येथे अद्याप पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, हे विशेष .सुरुवातीपासुनच स्थानिक ग्राम पंचायत,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय व उचलले पाऊल तसेच नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत या गावात रुग्ण संख्या "नो-कोरोना" अशी आहे. जिल्ह्यात सर्वात आधी देऊळघाट ग्राम पंचायतने गावकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊनच्या पूर्वी महानगरातून आलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारनटाईनचे शिक्के लावून घरी बसवले होते.आता हळू हळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या शहरासह गांव-खेड्यात जावून पोहोचला आहे.अशात काही दिवसापूर्वी देऊळघाट येथील सय्यद खलील पहेलवान (60) यांची प्रकृती बिघडली व त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयचे कोविड सेंटर मध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे स्वेब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले मात्र स्वेब रिपोर्ट येण्यापूर्वीच 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,नगरसेवक पति मो.अज़हर रुग्णालयात पोहोचले प्रशासनाशी समन्वय साधुन प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. गावात कोरोना मुळे मृत्यु झाल्याची अफवा व  भितीचे वातावरण पसरले होते.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष  लागले असतांना 27 ऑगस्टला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल "निगेटिव्ह" आल्याने फक्त नातेवाईकच नव्हे तर गावकऱ्यांसह प्रशासनाने ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते 
समृद्धी महामार्गाबद्दलच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी काल गायत्री कंपनी च्या कार्यालयात मीटिंग घेतली... यावेळी इतर विषया सोबत एक मुद्दा अजूनही खूप चर्चेत आला, रस्ता दुरुस्ती....
 यावेळी गावाच्या वतीने श्री विलासराव चव्हाण,किरण होन, शरद होन, सुधाकर होन,दादासाहेब होन,सचिन होन,प्रवीण होन,न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष सुनील होन यांनी गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी गावाला व शाळेला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, आणि गायत्री चे तात्याराव डुंगा यांचा गलथान कारभार आमदार साहेबांच्या लक्ष्यात आणून दिला,आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी समक्ष रस्ता पाहणी करून गायत्री कंपनी ला फटकारले व त्वरित रास्ता खडीकरण  करण्याच्या व पावसाळा संपताच 1 नोव्हेंबर पासून रास्ता डांबरीकरण करून मिळावा नाहीतर कार्यवाही चा इशारा दिला.तसेच समृद्धीच्या गायत्री कन्स्ट्रक्शनमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्याने काम मिळावे,स्थानिक मशिनरी धारकांना वेळत बिल अदा करण्यात यावे,स्थानिकांची कुणी अडवणूक करत असेल तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा दादांनी या वेळी उपस्थित सर्व  अधिकाऱ्यांना दिला                                              दादांची कार्यतत्परता व भूमीपुत्रांच्या साठीची तळमळ पाहून,सर्वांनी दादांचे कौतुक केले व आभार मानले. 
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, विलास चव्हाण,किरण होन,शरद होन,सुधाकर होन,व सर्व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती, तसेच रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे श्री. सूर्यवंशी, श्री. निरगुडे, श्री. बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी ) बेलापूर सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपावरुन  काही संचालकानी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून लाखो रूपयांचे पेट्रोल व डिझल तसेच रोख रकमा,इतर विभागातुन पाईप खते  नेलेले असुन सभासदांनाही  अशाच प्रकारे उधारीवर पेट्रोल  डिझेल देण्याची मागणी सुधाकर खंडागळे शिवाजी वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी केली आहे .सांस्थेला दिलेल्या निवेदनात वाबके खंडागळे बंगाळ कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही संचालकांनी संस्था स्वःतच्या मालकीची समजुन पेट्रोल  डिझेल तसेच इतर वस्तूची नोंद न करता उचल केलेली आहे संस्थेच्या दप्तरी या व्यवहाराची कसलीही नोंद नाही आता या व्यहाराचा गौप्यस्पोट झाल्यावर कर्मचार्यांचे दोन महिन्याचे पगार वसुलीच्या करणास्तव थांबवले आहेत.  त्याच धर्तीवर सभासद शेतकऱ्यांना उधारीवर पेट्रोल व डिझेल देण्यात यावा अशी मागणी संस्थेचे जेष्ठ सभासद सुधाकर खंडागळे यांच्यासह सभासदांनी केली आहे   संस्थेला  दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे शिवाजी पा वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही जेष्ठ व तज्ञ सभासदाच्या अथक प्रयत्नाने संस्थेला पंप परत मिळविण्यात यश आले याचा संचालक मंडळाला विसर पडला असुन काही जण आपलीच मालमत्ता समजुन राजरोसपणे पेट्रोल  डिझेल तसेच इतर वस्तू उधारीवर नेत आहे कर्मचार्यांनाही काम करावयाचे असल्याने हे सर्व निमूटपणे सहन करावे लागते पेट्रोल पंप हा सभासदांच्या मालकीचा आहे त्यामुळे त्यावर कुणा एकाने मालकी दाखवु नये जर संचालक मंडळातील काही लोक  पेट्रोल  डिझेल व इतर वस्तू कसलीही नोंद न करता  नेत असतील तर ती सवलत सर्व सभासदांना देण्यात यावी कोरोनाच्या लाँक डाउन मधे शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली असुन संस्थेने सभासद  शेतकऱ्यांना देखील संचालक मंडळा प्रमाणे पेट्रोल  व डिझेल उधारीवर द्यावे अशी मागणीही या सभासदांनी केली आहे या बाबत लवाकरच  सहाय्यक निबंधक यांनाही निवेदन देणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले आहे

मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावातील अंजनीसुर्य हेल्थ क्लबचा वतीने कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोराना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव रोखण्या हेतुने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार दिवसाची टाळेबंदी जाहीर केली असल्याने या रिकाम्या वेळात सामाजिक कार्य करण्याचा उद्देशाने डाऊच खुर्द येथील अंजनी सुर्य व्यायाम शाळेने पै.दिपकभाऊ कांदळकर, सरपंच पै़.संजय गुरसळ, ऋषीकेश ससाणे,देवा पवार,अमन चोपडा,तुषार व सहकारी तसेच ग्रामस्थांचा उपस्थितीत हेल्थ क्लब परीसरात वृक्षारोपनचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होतअसलेली वनराई हे देखील कारणीभूत असल्याने मागील काही वर्षापासून पर्जनमान अनियमित तसेच कमी अधिक प्रमाणात होत परिस्थिती अशीच राहिल्यास भावी पिढीचेभविष्य हे निश्चितपणेअंधकारमय होऊ शकते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड बरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने ही जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली
ते पुढे म्हणाले उत्तमआरोग्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे यात काही शंका नाही शरीर एखाद्या मशीनसारखेच आहे जर मशीन सतत चालू राहिली तर ते चांगले कार्य करते.तरी यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे सांगत
व्यायाम करण्याचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही संजय गुरसळ यांनी यावेळी दिला.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील निपाणी वडगांव येथील अधिकृत ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे पळविल्याप्रकरणी मागील महिन्यापासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी  समक्ष  ग्रामस्थांशी संवाद साधून अशोकनगरची चौकी ही अशोकनगरलाच असल्याचा खुलासा केला आहे.
            या प्रकरणी निपाणी वडगांव चे सरपंच आशिष दौंड, विकास सोसायटीचे चेअरमन  संतोष राऊत, मल्हार सेनेचे अध्यक्ष संजय राऊत व भगतसिग भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी गावकऱ्यांच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर 4 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
त्यात त्यांनी म्हटले होते की, निपाणी वडगांवची  अग्रक्रमांवर असलेली लोकसंख्या विचारात घेऊन अनेक वर्षांपासून अधिकृत मान्यता दिलेली ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे हलविलेपासून अशोकनगर येथील अधिकृत पोलीस चौकी बंद आहे. अशोकनगर चौकीसाठी नेमणुका असणारे पोलिसही हरेगाव फाटा  येथेच थांबण्यास जास्त उत्सुक दिसत आहे.  त्यामुळे गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने गावात  अवैद्य व्यवसाय, गुन्हेगारी, महिला अन्याय, छेडछाड, अवैद्य व्यवसायाशी संबधित गुंडाचे वाढते प्रमाण आदि बाबीवर वचक ठेवणे जिकरीचे झालेले आहेत. त्याकरता ग्रामपंचायतीचे तक्रारींचे निवेदनही देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने गावच्या न्याय हक्कासाठी गावची अधिकृत सजेचे पोलीस चौकी ही पूर्ववत ठिकाणी अशोकनगर येथेच चालू ठेवण्यात येवून ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करणे व गावातील अवैद्य व्यवसाय व गुन्हेगारीवर चाप लावणे करीता सदर चौकीच्या नेमणूका असणाऱ्या पोलिसांना चौकी बंद न ठेवण्याचे आदेश द्यावेत व हरेगाव फाटा येथे ‘अशोकनगर फाटा पोलीस चौकी’ हे केलेले बेकायदेशीर नामकरण त्वरित हटवावे. या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
            या प्रकरणी स्वतः शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व उपनिरीक्षक बहाकर यांनी अशोकनगर येथील पोलीस चौकीस समक्ष भेट देवून संवाद साधला, व अशोकनगरची पोलीस चौकी ही अशोकनगरलाच  असल्याचा खुलासा करून संबधित पोलिसांना अशोकनगर पोलीस चौकीत थांबण्याचा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी अशोक सह.साखर कारखान्याचे चे मा.अध्यक्ष सोपानराव राऊत यांच्या  प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस मा.सभापती सुनीताताई गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर राऊत, संजय गायधने,  रवींद्र पवार,संजय राऊत, दिपक राऊत, दिलीप राऊत, ज्ञानेश्वर खाडे, हमीद शेख, प्रशांतराजे शिंदे, ज्ञानेश्वर पडोळे, आप्पासाहेब दुशिंग, भारत वैरागर, दादासाहेब कापसे, बबन पाटोळे, आबा काळे, दादा राऊत  तसेच पो.कॉ. लोंढे, लोटके, किशोर जाधव, पोपट खराडे आदींसह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजासाठी अहोरात्र झटणा-या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ मोहन शिंदे व डॉ सचिन प-हे यांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या श्रीरामपूरतील अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर यांचा सन्मान म्हणून त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यांनी लॉकडाऊन काळात आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले तसेच अजूनही ते श्रीरामपुरातील लोकांना सेवा देण्याचे काम करत आहे त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे योगदान तसेच सहभाग व सहकार्याबद्दल श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या तर्फे सन्मानचिन्ह व बुके देऊन सन्मान करण्यात आला
श्रीरामपुर शहरातील कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजातील सर्व समाजाच्या नागरिकांना आरोग्य सुविधा सह विविध प्रकारे मदत करणा-या डॉक्टर क्षेत्रातील मान्यवरांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंचच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. के.के. आव्हाड मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. अनिल साळवे व जागृत नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. मनोजकुमार नवले व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔹धास्तावलेल्या ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..
बुलडाणा - 27 ऑगस्ट
तालुक्यातील देऊळघाट येथील 60 वर्षीय इसमाला श्वासनाचा त्रास होत असल्याने 4 दिवसापूर्वी  बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता व्यक्त होत असतांना, त्यांचा स्वॅब रिपोर्ट आज 27 ऑगस्टला निगेटिव्ह आला असून धास्तवलेल्या परिवारासह गावकरी व प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यक बहुल गावापैकी एक देऊळघाट आहे.येथे अद्याप पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, हे विशेष .सुरुवातीपासुनच स्थानिक ग्राम पंचायत,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय व उचलले पाऊल तसेच नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत या गावात रुग्ण संख्या "नो-कोरोना" अशी आहे. जिल्ह्यात सर्वात आधी देऊळघाट ग्राम पंचायतने गावकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊनच्या पूर्वी महानगरातून आलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारनटाईनचे शिक्के लावून घरी बसवले होते.आता हळू हळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या शहरासह गांव-खेड्यात जावून पोहोचला आहे.अशात काही दिवसापूर्वी देऊळघाट येथील सय्यद खलील पहेलवान (60) यांची प्रकृती बिघडली व त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयचे कोविड सेंटर मध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे स्वेब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले मात्र स्वेब रिपोर्ट येण्यापूर्वीच 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,नगरसेवक पति मो.अज़हर रुग्णालयात पोहोचले प्रशासनाशी समन्वय साधुन प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. गावात कोरोना मुळे मृत्यु झाल्याची अफवा व  भितीचे वातावरण पसरले होते.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष  लागले असतांना 27 ऑगस्टला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल "निगेटिव्ह" आल्याने फक्त नातेवाईकच नव्हे तर गावकऱ्यांसह प्रशासनाने ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बुलडाणा - 26 
बुलढाणा शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून 23 ऑगस्टच्या रात्री शहरातील तुळशिनगर भागातून एक मोटारसायकल चोरी गेले होते. मोटरसायकलचे मालक सचिन जुमळे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये 24 ऑगस्ट रोजी तक्रार दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल कण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास करीत डीबी ब्रांचचे मोरे व नागरे यांनी दोन संशयित युवक रामेश्वर पांडुरंग सूर्यवंशी वय 19 वर्ष तसेच सचिन जनार्दन घुले 19 वर्ष, दोन्ही रा. गायरान, सागवन यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडून सचिन जुमळेची मोटरसायकल तसेच इतर एक असे दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे तसेच अजून एक मोटर सायकल त्यांनी चोरून विल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार बाजड करीत आहे.

बुलडाणा - 26 ऑगस्ट
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावाचे रहिवासी शिक्षक शेख रहीम शेख ऊमर वय 53 वर्ष यांचा आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी शाळेत काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ते देऊळघाटचे माजी सरपंच बिस्मिल्लाह खाँ यांचे जावई होते. अत्यंत मनमिळावू व मितभाषी शिक्षक शेख रहीम हे देऊळघाट येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत होते. आपल्या कामाशी प्रामाणिक शिक्षक शेख रहीम आज सुटी असतानाही शाळेत जाऊन काही पेंडिंग कामे करीत असताना अचानक त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 1 मुलगी नातवंड असा आप्त परिवार आहे.

बुलडाणा - 26 ऑगस्ट
कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकुण 2744 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली असून सध्या 761 रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशा स्थितीत बुलडाणा शहरात हायटेक कोविड रुग्णालयांसह मकबधीर विद्यालय,आयुर्वेद महाविद्यालय या 2 कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांसह संशयितांवर उपचार केले जात आहे. सर्वच डॉक्टर अहोरात्र सेवा करत, घरापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असून हे डॉक्टर्स कोरोनाच्या कुरुक्षेत्रात समाजासाठी देवदूतच बनले  आहे.या 2 कोविड सेंटर मध्ये 10 डॉक्टरांचा चमू आळीपाळीने ड्युटी करत आहेत. एका डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागत आहे. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन २४ ऑगस्टला बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी व्हिसी द्वारे दिलेल्या निर्देशानुसार बुलडाणा इंन्सीडंट कंमाडर तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी नव्या ८२ खाजगी आयुष डॉक्टरांची ड्यूटी यादी प्रसिद्ध केली असून रुग्णसेवा आणखी सुकर होणार आहे.या बाबत तहसिलदार संतोष शिंदे म्हणाले की बुलडाणा तालुक्यातील ८२ खाजगी आयुष डॉक्टरांना अधिग्रहीत करण्यात आले असुन मुकबधिर विद्यालय व आयुर्वेदिक महाविद्यालय या २ कोवीड सेंटर येथे वेगवेगळ्या वेळेत आपली सेवा देणार असून त्यांचे ड्यूटीचे वेळ पत्रक ही ठरवून दिलेले आहे.

बुलडाणा - 25 ऑगस्ट 
बुलडाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनाकडून 3 वेळ आमदार राहिलेले विजयराज शिंदे आखेर आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा दुप्पटा त्यांच्या गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
     विजयराज शिंदे शिवसेनेत असतांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप शिंदे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विजयराज शिंदे यांचे उमेदवारीचे तिकीट कापुन खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढविली. मात्र त्यांना शिवसेनेचे गायकवाड यांनी पराजित केले. त्यांनी दुसऱ्या क्रंमाकाची मते घेतली होती. अशात आपला राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून विजयराज शिंदे काही पक्षांच्या नेत्यांशी भेटत होते. आज 25 ऑगस्ट रोजी विजयराज  शिंदे यांनी भाजपा च्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर या निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जामोदचे आ.डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष व खामगांव आ.एड आकाश फुंडकर, चिखली आमदार श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपाचे नेते योगेंद्र गोडे सह विजयराज शिंदे यांचे काही समर्थक ही उपस्थित होते.

बुलडाणा - 25 ऑगस्ट
महावितरणच्या वतीने ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले ही अत्यंत वाढीव आणि चुकीच्या रिडींगद्वारे देण्यात आली आहेत. नेहमीपेक्षा तीप्पट तर काहींना पाचपट रकमेची बिले आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता चुकीची वीजबिले माफ करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लाऊन धरली आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केले मात्र त्याउपरही कोणतीच दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होत २४ ऑगस्टच्या सायंकाळी बुलडाणा अधीक्षक अभियंता देव्हाते यांचे कक्ष गाठले, त्यांनी चुकीची उत्तरे दिल्याने तुपकरांनी कार्यालयातच ठिय्या मांडला व तब्बल चार तास ठिय्या मांडल्यानंतर रविकांत तुपकर अधिक आक्रमक झाल्याचे पाहून अधीक्षक अभियंता यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत आलेली संपूर्ण चुकीची वीजबिले माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे हजारो सर्वसामान्य विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चुकीच्या वीजबिले आणि महावितरणाचा सावळा गोंधळ याबाबत माहिती देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी आज 25 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या वेळी तुपकरांनी मीटर रीडिंग, विज बिल वाटप करणाऱ्या विविध एजन्सी व महावितरणच्या अधिकाऱ्यां मध्ये साटेलोटे असल्याचा आरोप ही करत या  पुढे जर विज कनेक्शन कट करायला एमएसईबीचा कोणी अधिकारी आला तर त्याला कपडे काढून नागडा फटके देऊ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्य मंत्री रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा - 24 ऑगस्ट
बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आपला राजकीय पुनर्वसन करण्याच्या तैयारीत असून ते भाजपची वाट धरणार असल्याची जोरदार चर्चा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली असून उद्या 25 ऑगस्ट रोजी ते भाजपात आपले काही कार्यकर्त्यां सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
      भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी विजयराज शिंदे यांचे बोलणेही झाल्याचे समजते. याबाबत विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला नेहमी भरभारुन साथ देणारे व माझी ताकत असलेले माझे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच बुलडाण्याच्या राजकारणात भूकंप घडणार आहे .1995 पासून तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर  निवडून येवून बुलडाणा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत खूप मोठे योगदान आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख ते आमदार,जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा विजयरथ रोखला होता.शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेने कडून उमेदवारी मिळाली नव्होती व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बुलडाणा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवत दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गायकवाड आमदार झाले आहे.आता आपला राजकीय पुनर्वसन व्हावा म्हणून विजयराज शिंदे आता भाजपाच्या वाटेवर असून उद्या मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मधुकर वक्ते कोपरगाव प्रातिनिधी
      कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल बिघडण्याला वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होत असलेली वनराई हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून अनियमित व कमी प्रमाणात होत असलेले पर्जन्यमान,अति उष्णता,काही भागात कमी पर्जन्यमान तर काही भागात महापूर अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अशीच राहिली तर भावी पिढीचे भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन  संजय वक्ते व त्यांचे मित्र पोपट सोळके  यांनी दिली आहे.या दोन मित्रांनी वृक्षारोपण करून एक निसर्गा विषय कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी वृक्षारोपण करतांना दिनकर सोळके, तेजेस वक्ते, राजू वक्ते, अनिल वक्ते, मधुकर वक्ते ,दिपक गरूड,आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर नगरपालिकेतील अविभाज्य भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यामुळे भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत,प्रभागात संजय नगर सोसायटी, रामनगर,संजयनगर परिसर,ईदगाह परिसर,अचानक नगर,गोपीनाथनगर परिसर,मिल्लतनगर च परिसर,उस्मानिया मस्जिद परिसर असा विस्तृत भाग आहे,यात सगळीकडे रस्ते खराब झालेले असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणे मुश्किल होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये अबाल वृद्ध,गर्भवती असणाऱ्या माता भगिनींना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते,अशा परिस्थितीत भागातील नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन त्यामध्ये सर्व रस्ते हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण अथवा गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक चेच करण्यात यावे अशी विनंती करण्यात येऊन रस्त्यांची सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली रस्ते होत असताना माती मिश्रित मुरुमाची न होता दीर्घ काळ टिकणारी अशी पक्क्या स्वरूपात करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली,
सदर निवेदनाची तात्काळ दखल न घेण्यात आल्यास नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलने करण्याची वेळ आजच्या कोरोना सारख्या महामारी मध्ये येऊ नये अशी नम्र विनंती या वेळी करण्यात आली.
यावेळी सदर निवेदनाची एक प्रत नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांना देण्यात आली,यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी निवेदनावर सह्या करून सदर निवेदन हे कोरोना चे प्रशासनिक नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात शरीफ भाई शेख,राहुल कुलकर्णी, रवि बोर्डे,मनीष पंचमुख, इम्रान भाई दारुवाला,इम्रान पटेल,बबलू म्हस्के,अभिजित चक्रे,आयुब पठाण,अविनाश पंडित आदी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितत देण्यात  आले.

बुलडाणा - 23 ऑगस्ट
बुलडाणा एलसीबीच्या एका पथका द्वारे केलेली कार्रवाईची बातमी फेसबुकच्या पेजवर पोस्ट झाली असता खामगांव येथील एका विघ्नसंतोषीने पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी कमेंट त्या फेसबुक पेजच्या पोस्ट खाली केल्याने त्याच्या विरोधात खामगांव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीची भूमिका महत्वाची असते. एलसीबीचे अधिकारी,कर्मचारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडते.अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा होतात परंतु काही विघ्नसंतोषींना एलसीबीची चांगली कामगिरी डोळ्यात सलते. बुलडाणा एलसीबीच्या एका पथकाने बुलडाणा येथील एका अट्टल मोबाइल चोराला अटक करून त्याच्याकडून काही मोबाइल जप्त केले होते.याची बातमी "पब्लिक ऍप" च्या फेसबुक पेजवर 25 जुलै रोजी प्रसारित झाली होती.या बातमी संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये खामगांव येथील आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने एलसीबी पथकाची अर्थात पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी व आक्षेपहार्य कमेंट पोस्ट केली आहे. याची बुलडाणा एलसीबीला माहिती झाली.या प्रकरणी फेसबुक वापरकर्ता इसम विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने अत्यंत बेजबाबदारपणाने सदरची पोस्ट प्रसारित केल्याने पोलिस दला विषयी समाजा मध्ये अप्रीतिची भावना निर्माण झाली आहे,त्यामुळे बुलडाणा एलसीबीच्या वतीने या प्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या तक्रारीवर फेसबुक पेजवर पोलिसा विरोधात आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे विरुद्ध पोलिस (अप्रीतिची भावना चेतावणे) अधिनियम 1922 ची कलम 3 अन्वये खामगांव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आहे.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून रघुनाथ आगळे हे २००३ साली सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रात्री झोपेत असताना अचानक दरवाजा वाजल्याच्या आवाज आला. यावेळी  आगळे यांच्या पत्नीने हॉलमध्ये येऊन पती रघुनाथ आगळे यांना उठविले. याचवेळी  घराचे दार तोडून चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके तर दुसºयाच्या हातात काहीतरी धारदार हत्यार होते. त्यातील एकाने श्री व सौ. आगळे  यांना गप्प बसा अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सौ. आगळे यांच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. तर दुसºयाने हातातील सोन्याची बांगडी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने ती बांगडी कापली. त्यावेळी सौ.आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यावेळी आगळे यांनी आरडाओरडा केल्याने बाहेर उभा असलेल्या चोरट्यांच्या साथीदाराने लवकर आवरा कोणीतरी येत आहे असे सांगितले. त्यावेळी हातातील कापलेली बांगडी खाली पडली. ती तशीच सोडून चारही चोरटे घराबाहेर पळून गेले. आरडाओरडा करीत आगळे हे त्यांच्या मागे पळाले असता घराच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उड्या मारून पाच जण पळून जातांना त्यांना दिसले. चोरट्यांनी १ लाख ४० हजार किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले आहे. याबाबत आगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा - 22 ऑगस्ट
हातनी ते दूधा या राष्ट्रीय माहामार्गा वरील घाटनांद्रा गावा जवळ बायपाससाठी शेत जमीनीचे भूसंपादन करु नये, अशी आग्रही मागणी करीत घाटनांद्रा येथील 7 शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण किंवा आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
     बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा  येथील शेतकऱ्यांनी याबाबत 21 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्र.753 चिखली ते भोकरदन म्हणजे हातनी ते दूधा या रस्त्यासाठी घाटनांद्रा गावाजवळ संबंधित विभाग बायपास करणार आहे.परंतु या बायपाससाठी आमच्या शेत जमीन अधिग्रहित केली जाणार,या ठीकाणी 3 पक्क्या विहीरी व 1 बोअरवेल आहे. या रस्त्यात पुर्वी सुध्दा आमची जमीनी गेल्याने आम्ही आगोदरच अल्पभूधारक झालो. पुर्वीचा रस्ता असतांना शासन नाहक बायपास रस्ता काढण्याबाबत नोटीस देत आहे. 14 जुलैला हरकत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपअधिक्षक भूमि अभिलेख बुलडाणा कार्यालयातून कोणत्याच प्रकारची विचारपूस झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.पुर्वीचा रस्ता कायम ठेवून विकसीत करण्यात यावा,नवीन बायपास करण्यात येवू नये,अन्यथा आम्ही परिवारासह उपोषण किंवा आत्महत्या करू, असा इशारा शेतकरी दत्तू विठ्ठल पुरी, सुभाष भुसारी, गजानन भुसारी, भावराव भुसारी,भाऊसिंग सोळंके, मधुकर भुसारी, शेषराव भुसारी यांनी दिला आहे.

बुलडाणा - 19 ऑगस्ट
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षात असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यात पिवळे फेटे बांधून विधानसभेत धनगर आरक्षण मागत होते.आता हेच सत्तेत बसून एक वर्ष होऊन गेले पण धनगर आरक्षणाबद्दल तोंडात शब्द काढत नाही.ही राज्यातील दीड कोटी धनगर समाजाची अवहेलना आहे.या विरोधात जय मल्हार सेनेने 13 ऑगस्ट पासुन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामध्ये राज्यभरातून धनगर समाजाच्या वतीने 11 लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.आता पर्यंत 4 लाख पोस्टकार्ड पाठविले असून बुलडाणा जिल्ह्यातून 21 हजार कार्ड पाठवणार आहे. या माध्यमाने सत्तेतील नेत्यांना धनगर आरक्षणाची आठवण करून देणार आहेत.या संदर्भात आज 19 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील विश्राम भावनात जय मल्हार सेनेच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सरसेना पती लहु शेवाळे,श्रीमती रंजनाताई बोरसे,नामदेव बाजोडे,संतोष वरखेड़े,धोंडीराम गोयकर व इतर समाज बांधव हजर होते.

🔹नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
बुलडाणा - 19 ऑगस्ट
मागील दीड ते दोन वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील हातनी ते दुधा या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणकार्य संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना बसला होता तर यावर्षीही नियोजनशून्य कामामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.
      मागील दोन-तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.अशात 17 ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यातील रायपूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हातनी ते दूधा या रायपूरहुन जाणाऱ्या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित नाल्या केल्या नाही,त्यामुळे पावसाचे पाणी अनेक शेतात शिरल्याने उभे पीक व शेतजमीन वाहून गेली आहे. रायपूर येथील शेतकरी तजम्मुल हक जियाउल हक यांच्या 3 एकर शेतात गोबी,कोथिंबीर व इतर भाजी पाल्याची लागवड त्यांनी उसनवारीने पैशे घेऊन केली मात्र त्यांच्या शेतात पाणी घुसले व पूर्ण पिक पाण्यात बुडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ठेकेदाराने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तजम्मुल हक यांनी केली आहे.

बुलडाणा - 17 ऑगस्ट
बुलडाणा तालुक्यातील सैलानी परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने इतिहासात पहिल्यांदा येथील नदी-नाले पाट सोडून वाहत होते. अनेक घरात सैलानी येथे हे पाणी शिरले होते तर दुपारी चार वाजेच्या सुमारास सैलानी येथील बाग जाली परिसरात एक वेडसर इसम शाहनवाज कुरेशी वय 35 वर्ष राहणार बीड हा नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याला एका ठिकाणी पुलावर काही लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचण्यास अपयश आले. जवळपास पाचशे मीटर पुढे शेख अफसर मुजावर यांच्या म्युझियम जवळ एका एंगलला पकडन्यास त्याला यश आले. ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात आली परिसरात भरपूर पाणी होता चार ते पाच फुटापर्यंत पाणी असल्याने त्याला वाचवँयाची हिम्मत शेख शोएब शेख अफसर मुजावर, शेख अरबाज शेख अफसर मुजावर, शेख हारून शेख सुल्तान ,कैलाश चव्हाण व सुदामा गवारे या पाच लोकांनी दाखवली व रस्सी बांधून ते पाण्यात पोहोचले व पाण्यात पडलेल्या या इसमाला वाचवून बाहेर आणले. अशा प्रकारे या युवकांनी एका वेडसर इसमाला वाहत जात असताना वाचवले आहे. या धाडसी युवकांचे पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर सह ग्रामस्थाननी कौतुक केले आहे.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
कोरोना संसर्गाच्या संकटकाळात जिल्हा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील जमीअत उलमा -ए- हिन्द बुलडाणा जिल्हा शाखाच्या वतीने आरोग्यवर्धक मालेगावच्या प्रसिद्ध मंसूरा काढाचे वाटप पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे.
    बुलडाणा शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुने कहर केला आहे. दोन हजारावर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली.या कोरोना माहामारीच्या काळात मात्र कोरोना योद्धयाची भूमिका पार पाडत रस्त्यावर उतरलेला पत्रकार आपली नैतिक जबाबदारी म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घटनेची बातमी पोहोचवत आहे. या कोरोना योद्धांची प्रतिकार शक्ति वाढ़ावी या उद्देशाने बुलडाणा शहरातील सर्व पत्रकार बांधवांना जमीअत उलेमा-ए-हिंद,शाखा बुलडाणा जिल्हाच्या वतीने मालेगांवचा मंसूरा काढा वाटप करण्यात आला आहे.हा काढा महेफिल-ए-यारां ग्रुप मालेगांवच्या वतीने जमीअतला देण्यात आला होता.पत्रकार भवन येथे काढा वाटप करतांना जमीअत उलेमा बुलडाणा जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलीलउल्लाह,उपाध्यक्ष मौलाना ज़िया,हाफिज़ इरफान,अंसारी मो मतीन,हाफिज़ अफरोज़ व इतर सदस्य हजर होते.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे एका 27 वर्षीय युवकाने घरासमोरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री समोर आली आहे.
       बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरखंडाळा येथील राहणारे 27 वर्षीय संदीप गोविंदा पवार यांनी काल 15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील शेवग्याचा झाडावर दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला फासावर लटकलेला अवस्थेतून खाली काढले व तात्काळ वरवंड येथील प्रा.आरोग्य केंद्रात नेले तेव्हां तो श्वास घेत होता मात्र अधिक उपचारची गरज होती म्हणून बुलडाण्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. याबाबत बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. घरगुती वादातून संदीपने ही  टोकाची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रमेश बंसोड व जनार्धन इंगळे करीत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget