बुलडाणा - 26 ऑगस्ट
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावाचे रहिवासी शिक्षक शेख रहीम शेख ऊमर वय 53 वर्ष यांचा आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी शाळेत काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ते देऊळघाटचे माजी सरपंच बिस्मिल्लाह खाँ यांचे जावई होते. अत्यंत मनमिळावू व मितभाषी शिक्षक शेख रहीम हे देऊळघाट येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत होते. आपल्या कामाशी प्रामाणिक शिक्षक शेख रहीम आज सुटी असतानाही शाळेत जाऊन काही पेंडिंग कामे करीत असताना अचानक त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 1 मुलगी नातवंड असा आप्त परिवार आहे.
Post a Comment