बुलडाणा - 26 ऑगस्ट
कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकुण 2744 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली असून सध्या 761 रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशा स्थितीत बुलडाणा शहरात हायटेक कोविड रुग्णालयांसह मकबधीर विद्यालय,आयुर्वेद महाविद्यालय या 2 कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांसह संशयितांवर उपचार केले जात आहे. सर्वच डॉक्टर अहोरात्र सेवा करत, घरापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असून हे डॉक्टर्स कोरोनाच्या कुरुक्षेत्रात समाजासाठी देवदूतच बनले आहे.या 2 कोविड सेंटर मध्ये 10 डॉक्टरांचा चमू आळीपाळीने ड्युटी करत आहेत. एका डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागत आहे. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन २४ ऑगस्टला बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी व्हिसी द्वारे दिलेल्या निर्देशानुसार बुलडाणा इंन्सीडंट कंमाडर तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी नव्या ८२ खाजगी आयुष डॉक्टरांची ड्यूटी यादी प्रसिद्ध केली असून रुग्णसेवा आणखी सुकर होणार आहे.या बाबत तहसिलदार संतोष शिंदे म्हणाले की बुलडाणा तालुक्यातील ८२ खाजगी आयुष डॉक्टरांना अधिग्रहीत करण्यात आले असुन मुकबधिर विद्यालय व आयुर्वेदिक महाविद्यालय या २ कोवीड सेंटर येथे वेगवेगळ्या वेळेत आपली सेवा देणार असून त्यांचे ड्यूटीचे वेळ पत्रक ही ठरवून दिलेले आहे.
Post a Comment