बुलडाणा - 25 ऑगस्ट
बुलडाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनाकडून 3 वेळ आमदार राहिलेले विजयराज शिंदे आखेर आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा दुप्पटा त्यांच्या गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विजयराज शिंदे शिवसेनेत असतांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप शिंदे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विजयराज शिंदे यांचे उमेदवारीचे तिकीट कापुन खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढविली. मात्र त्यांना शिवसेनेचे गायकवाड यांनी पराजित केले. त्यांनी दुसऱ्या क्रंमाकाची मते घेतली होती. अशात आपला राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून विजयराज शिंदे काही पक्षांच्या नेत्यांशी भेटत होते. आज 25 ऑगस्ट रोजी विजयराज शिंदे यांनी भाजपा च्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर या निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जामोदचे आ.डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष व खामगांव आ.एड आकाश फुंडकर, चिखली आमदार श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपाचे नेते योगेंद्र गोडे सह विजयराज शिंदे यांचे काही समर्थक ही उपस्थित होते.
Post a Comment