बुलडाणा - 26
बुलढाणा शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून 23 ऑगस्टच्या रात्री शहरातील तुळशिनगर भागातून एक मोटारसायकल चोरी गेले होते. मोटरसायकलचे मालक सचिन जुमळे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये 24 ऑगस्ट रोजी तक्रार दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल कण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास करीत डीबी ब्रांचचे मोरे व नागरे यांनी दोन संशयित युवक रामेश्वर पांडुरंग सूर्यवंशी वय 19 वर्ष तसेच सचिन जनार्दन घुले 19 वर्ष, दोन्ही रा. गायरान, सागवन यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडून सचिन जुमळेची मोटरसायकल तसेच इतर एक असे दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे तसेच अजून एक मोटर सायकल त्यांनी चोरून विल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार बाजड करीत आहे.
Post a Comment