बुलडाणा एलसीबी विरोधात फेसबुकवर आपत्तीजनक कमेंट करणाऱ्यावर खामगांव येथे गुन्हा दाखल.

बुलडाणा - 23 ऑगस्ट
बुलडाणा एलसीबीच्या एका पथका द्वारे केलेली कार्रवाईची बातमी फेसबुकच्या पेजवर पोस्ट झाली असता खामगांव येथील एका विघ्नसंतोषीने पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी कमेंट त्या फेसबुक पेजच्या पोस्ट खाली केल्याने त्याच्या विरोधात खामगांव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीची भूमिका महत्वाची असते. एलसीबीचे अधिकारी,कर्मचारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडते.अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा होतात परंतु काही विघ्नसंतोषींना एलसीबीची चांगली कामगिरी डोळ्यात सलते. बुलडाणा एलसीबीच्या एका पथकाने बुलडाणा येथील एका अट्टल मोबाइल चोराला अटक करून त्याच्याकडून काही मोबाइल जप्त केले होते.याची बातमी "पब्लिक ऍप" च्या फेसबुक पेजवर 25 जुलै रोजी प्रसारित झाली होती.या बातमी संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये खामगांव येथील आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने एलसीबी पथकाची अर्थात पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी व आक्षेपहार्य कमेंट पोस्ट केली आहे. याची बुलडाणा एलसीबीला माहिती झाली.या प्रकरणी फेसबुक वापरकर्ता इसम विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने अत्यंत बेजबाबदारपणाने सदरची पोस्ट प्रसारित केल्याने पोलिस दला विषयी समाजा मध्ये अप्रीतिची भावना निर्माण झाली आहे,त्यामुळे बुलडाणा एलसीबीच्या वतीने या प्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या तक्रारीवर फेसबुक पेजवर पोलिसा विरोधात आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे विरुद्ध पोलिस (अप्रीतिची भावना चेतावणे) अधिनियम 1922 ची कलम 3 अन्वये खामगांव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget