बुलडाणा - 24 ऑगस्ट
बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आपला राजकीय पुनर्वसन करण्याच्या तैयारीत असून ते भाजपची वाट धरणार असल्याची जोरदार चर्चा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली असून उद्या 25 ऑगस्ट रोजी ते भाजपात आपले काही कार्यकर्त्यां सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी विजयराज शिंदे यांचे बोलणेही झाल्याचे समजते. याबाबत विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला नेहमी भरभारुन साथ देणारे व माझी ताकत असलेले माझे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच बुलडाण्याच्या राजकारणात भूकंप घडणार आहे .1995 पासून तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येवून बुलडाणा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत खूप मोठे योगदान आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख ते आमदार,जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा विजयरथ रोखला होता.शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेने कडून उमेदवारी मिळाली नव्होती व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बुलडाणा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवत दुसर्या क्रमांकाची मते घेतली मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गायकवाड आमदार झाले आहे.आता आपला राजकीय पुनर्वसन व्हावा म्हणून विजयराज शिंदे आता भाजपाच्या वाटेवर असून उद्या मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.
Post a Comment