बुलडाणा - 16 ऑगस्ट
कोरोना संसर्गाच्या संकटकाळात जिल्हा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील जमीअत उलमा -ए- हिन्द बुलडाणा जिल्हा शाखाच्या वतीने आरोग्यवर्धक मालेगावच्या प्रसिद्ध मंसूरा काढाचे वाटप पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे.
बुलडाणा शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुने कहर केला आहे. दोन हजारावर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली.या कोरोना माहामारीच्या काळात मात्र कोरोना योद्धयाची भूमिका पार पाडत रस्त्यावर उतरलेला पत्रकार आपली नैतिक जबाबदारी म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घटनेची बातमी पोहोचवत आहे. या कोरोना योद्धांची प्रतिकार शक्ति वाढ़ावी या उद्देशाने बुलडाणा शहरातील सर्व पत्रकार बांधवांना जमीअत उलेमा-ए-हिंद,शाखा बुलडाणा जिल्हाच्या वतीने मालेगांवचा मंसूरा काढा वाटप करण्यात आला आहे.हा काढा महेफिल-ए-यारां ग्रुप मालेगांवच्या वतीने जमीअतला देण्यात आला होता.पत्रकार भवन येथे काढा वाटप करतांना जमीअत उलेमा बुलडाणा जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलीलउल्लाह,उपाध्यक्ष मौलाना ज़िया,हाफिज़ इरफान,अंसारी मो मतीन,हाफिज़ अफरोज़ व इतर सदस्य हजर होते.
Post a Comment