कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते
समृद्धी महामार्गाबद्दलच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी काल गायत्री कंपनी च्या कार्यालयात मीटिंग घेतली... यावेळी इतर विषया सोबत एक मुद्दा अजूनही खूप चर्चेत आला, रस्ता दुरुस्ती....
यावेळी गावाच्या वतीने श्री विलासराव चव्हाण,किरण होन, शरद होन, सुधाकर होन,दादासाहेब होन,सचिन होन,प्रवीण होन,न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष सुनील होन यांनी गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी गावाला व शाळेला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, आणि गायत्री चे तात्याराव डुंगा यांचा गलथान कारभार आमदार साहेबांच्या लक्ष्यात आणून दिला,आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी समक्ष रस्ता पाहणी करून गायत्री कंपनी ला फटकारले व त्वरित रास्ता खडीकरण करण्याच्या व पावसाळा संपताच 1 नोव्हेंबर पासून रास्ता डांबरीकरण करून मिळावा नाहीतर कार्यवाही चा इशारा दिला.तसेच समृद्धीच्या गायत्री कन्स्ट्रक्शनमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्याने काम मिळावे,स्थानिक मशिनरी धारकांना वेळत बिल अदा करण्यात यावे,स्थानिकांची कुणी अडवणूक करत असेल तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा दादांनी या वेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिला दादांची कार्यतत्परता व भूमीपुत्रांच्या साठीची तळमळ पाहून,सर्वांनी दादांचे कौतुक केले व आभार मानले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, विलास चव्हाण,किरण होन,शरद होन,सुधाकर होन,व सर्व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती, तसेच रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे श्री. सूर्यवंशी, श्री. निरगुडे, श्री. बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.
Post a Comment