बेलापूर (प्रतिनिधी ) बेलापूर सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपावरुन काही संचालकानी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून लाखो रूपयांचे पेट्रोल व डिझल तसेच रोख रकमा,इतर विभागातुन पाईप खते नेलेले असुन सभासदांनाही अशाच प्रकारे उधारीवर पेट्रोल डिझेल देण्याची मागणी सुधाकर खंडागळे शिवाजी वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी केली आहे .सांस्थेला दिलेल्या निवेदनात वाबके खंडागळे बंगाळ कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही संचालकांनी संस्था स्वःतच्या मालकीची समजुन पेट्रोल डिझेल तसेच इतर वस्तूची नोंद न करता उचल केलेली आहे संस्थेच्या दप्तरी या व्यवहाराची कसलीही नोंद नाही आता या व्यहाराचा गौप्यस्पोट झाल्यावर कर्मचार्यांचे दोन महिन्याचे पगार वसुलीच्या करणास्तव थांबवले आहेत. त्याच धर्तीवर सभासद शेतकऱ्यांना उधारीवर पेट्रोल व डिझेल देण्यात यावा अशी मागणी संस्थेचे जेष्ठ सभासद सुधाकर खंडागळे यांच्यासह सभासदांनी केली आहे संस्थेला दिलेल्या निवेदनात सुधाकर खंडागळे शिवाजी पा वाबळे भास्कर बंगाळ प्रभाकर कुर्हे यांनी पुढे म्हटले आहे की काही जेष्ठ व तज्ञ सभासदाच्या अथक प्रयत्नाने संस्थेला पंप परत मिळविण्यात यश आले याचा संचालक मंडळाला विसर पडला असुन काही जण आपलीच मालमत्ता समजुन राजरोसपणे पेट्रोल डिझेल तसेच इतर वस्तू उधारीवर नेत आहे कर्मचार्यांनाही काम करावयाचे असल्याने हे सर्व निमूटपणे सहन करावे लागते पेट्रोल पंप हा सभासदांच्या मालकीचा आहे त्यामुळे त्यावर कुणा एकाने मालकी दाखवु नये जर संचालक मंडळातील काही लोक पेट्रोल डिझेल व इतर वस्तू कसलीही नोंद न करता नेत असतील तर ती सवलत सर्व सभासदांना देण्यात यावी कोरोनाच्या लाँक डाउन मधे शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली असुन संस्थेने सभासद शेतकऱ्यांना देखील संचालक मंडळा प्रमाणे पेट्रोल व डिझेल उधारीवर द्यावे अशी मागणीही या सभासदांनी केली आहे या बाबत लवाकरच सहाय्यक निबंधक यांनाही निवेदन देणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले आहे
Post a Comment