🔹धास्तावलेल्या ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..
बुलडाणा - 27 ऑगस्ट
तालुक्यातील देऊळघाट येथील 60 वर्षीय इसमाला श्वासनाचा त्रास होत असल्याने 4 दिवसापूर्वी बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता व्यक्त होत असतांना, त्यांचा स्वॅब रिपोर्ट आज 27 ऑगस्टला निगेटिव्ह आला असून धास्तवलेल्या परिवारासह गावकरी व प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यक बहुल गावापैकी एक देऊळघाट आहे.येथे अद्याप पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, हे विशेष .सुरुवातीपासुनच स्थानिक ग्राम पंचायत,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय व उचलले पाऊल तसेच नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत या गावात रुग्ण संख्या "नो-कोरोना" अशी आहे. जिल्ह्यात सर्वात आधी देऊळघाट ग्राम पंचायतने गावकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊनच्या पूर्वी महानगरातून आलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारनटाईनचे शिक्के लावून घरी बसवले होते.आता हळू हळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या शहरासह गांव-खेड्यात जावून पोहोचला आहे.अशात काही दिवसापूर्वी देऊळघाट येथील सय्यद खलील पहेलवान (60) यांची प्रकृती बिघडली व त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयचे कोविड सेंटर मध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे स्वेब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले मात्र स्वेब रिपोर्ट येण्यापूर्वीच 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,नगरसेवक पति मो.अज़हर रुग्णालयात पोहोचले प्रशासनाशी समन्वय साधुन प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. गावात कोरोना मुळे मृत्यु झाल्याची अफवा व भितीचे वातावरण पसरले होते.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना 27 ऑगस्टला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल "निगेटिव्ह" आल्याने फक्त नातेवाईकच नव्हे तर गावकऱ्यांसह प्रशासनाने ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Post a Comment