बुलडाणा - 22 ऑगस्ट
हातनी ते दूधा या राष्ट्रीय माहामार्गा वरील घाटनांद्रा गावा जवळ बायपाससाठी शेत जमीनीचे भूसंपादन करु नये, अशी आग्रही मागणी करीत घाटनांद्रा येथील 7 शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण किंवा आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील शेतकऱ्यांनी याबाबत 21 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्र.753 चिखली ते भोकरदन म्हणजे हातनी ते दूधा या रस्त्यासाठी घाटनांद्रा गावाजवळ संबंधित विभाग बायपास करणार आहे.परंतु या बायपाससाठी आमच्या शेत जमीन अधिग्रहित केली जाणार,या ठीकाणी 3 पक्क्या विहीरी व 1 बोअरवेल आहे. या रस्त्यात पुर्वी सुध्दा आमची जमीनी गेल्याने आम्ही आगोदरच अल्पभूधारक झालो. पुर्वीचा रस्ता असतांना शासन नाहक बायपास रस्ता काढण्याबाबत नोटीस देत आहे. 14 जुलैला हरकत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपअधिक्षक भूमि अभिलेख बुलडाणा कार्यालयातून कोणत्याच प्रकारची विचारपूस झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.पुर्वीचा रस्ता कायम ठेवून विकसीत करण्यात यावा,नवीन बायपास करण्यात येवू नये,अन्यथा आम्ही परिवारासह उपोषण किंवा आत्महत्या करू, असा इशारा शेतकरी दत्तू विठ्ठल पुरी, सुभाष भुसारी, गजानन भुसारी, भावराव भुसारी,भाऊसिंग सोळंके, मधुकर भुसारी, शेषराव भुसारी यांनी दिला आहे.
Post a Comment