🔹नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
बुलडाणा - 19 ऑगस्ट
मागील दीड ते दोन वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील हातनी ते दुधा या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणकार्य संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना बसला होता तर यावर्षीही नियोजनशून्य कामामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.
मागील दोन-तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.अशात 17 ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यातील रायपूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हातनी ते दूधा या रायपूरहुन जाणाऱ्या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित नाल्या केल्या नाही,त्यामुळे पावसाचे पाणी अनेक शेतात शिरल्याने उभे पीक व शेतजमीन वाहून गेली आहे. रायपूर येथील शेतकरी तजम्मुल हक जियाउल हक यांच्या 3 एकर शेतात गोबी,कोथिंबीर व इतर भाजी पाल्याची लागवड त्यांनी उसनवारीने पैशे घेऊन केली मात्र त्यांच्या शेतात पाणी घुसले व पूर्ण पिक पाण्यात बुडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ठेकेदाराने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तजम्मुल हक यांनी केली आहे.
Post a Comment