व्हाट्सअप द्वारे खोटे माहिती पसरवणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल, खोटा मेसेज पाठवुन जनतेत खोटी माहिती व अफवा पसरवुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे केले उल्लंघन.
कोरोना विषाणु (कोव्हीड १९) हा संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता मा.पंतप्रधान भारत सरकार,
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर तसेच भारत सरकार प्रशासन " कोरोना विषाणु " या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होणार नाही व कोरेना बाधीत रुग्णांची संख्येत बाढ होवु नये याकरीता उच्चस्तराच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडुन अन्य व्यक्तीस / इसमास त्याचे संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असते.
महराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड - १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथराग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. याच अनुशंगाने मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेश क्रमाक आव्यमपु/कार्या १९/२०८/२०२० आदेश अहमदनगर दि. १६/०३/२०२० अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीस/संस्था/संघटना
कोव्हीड - १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या
माध्यमातुन पसरविणेस साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व
नियमावलीमधील तरतुदीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (१) अन्वये प्रतिबंध केलेबाबत आदेश जारी केलेले आहेत. आरोपी इसम नामे ताहिर शेख रा.मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर याने त्याचे मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ वरुन कोरोना आजारा संदर्भात सुफीयाना शेख युवा मंच या व इतर ग्रुपवर ' दि. २९/०३/२०२० रोजी आज रात १० बजे से मुकुंदनगर फकिरवाडा भाग मिलीट्रीच्या हातात देणार असुन मुकुंदनगर फकिरवाडा भागातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच दि. ३०/०३/२०२० रोजी विविध ग्रुपवर " आज मिलीटी मस्जीद के सामने कुछ सरकारी अधिकारी के साथ घुम रही है और घरके लोगोंके बारेमे पुछे तो नाम और मोबाईल नंबर नही देना " असे खोटा मेसेज पाठवुन जनतेत खोटी माहिती व अफवा पसरवुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आरोपी ताहिर शेख रा.मुकुंदनगर मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ याचेवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1 ३६९/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तरी अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्वाना आवाहन करण्यात येते की, कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात व्हॉटसअप किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये निराधार, अफवा असलेली माहिती प्रसारीत करु नये. तसेच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत विश्वसनीय प्रशासकीय वृताव्दारे प्रसारीत केलेल्या माहिती व्यतीरिक्त इतर खोटया आशयाचे वृत्तांवर विश्वास ठेवु नये. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर प्रचलीत कायदयान्वये सक्त व कठोर कारवाई करण्यात येईल.