श्रीरामपूर- कोरोना विषाणू संसर्गामुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात खान यांनी नमूद केले आहे की, राज्याचे परिवहन आयुक्त यांनी आज (26 मार्च) रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस व परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे, व कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सदरचे प्रमाणपत्र हे केवळ लॉकडाऊनच्या कालावधीपुरते वैध राहील.
सध्या लागु असलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालवाहु वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यालयात मध्ये स्थापित केला असुन मालवाहु मालकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन अर्ज केल्यास त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्यात येईल किंवा ज्या वाहन मालकांना कार्यालयात येणे शक्य नाही त्यांना ईमेलद्वारे प्रमाणपत्र जारी करण्याची व्यवस्था जारी करण्यात आली आहे. त्यासाठी mh17@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
![]() |
आर्ज करतांना लागणारे फॉर्म |
• वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.बुक)
• वाहना संदर्भातील सर्व प्रकारच्या कर पुस्तिका
• वाहनाचे विमा प्रमाणपत्र (इन्शुरन्स)
• वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट)
• वाहनाचा परवाना (परमिट)
• वाहन चालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स)
• वाहन चालकाचे व सहाय्यकाचे ओळखपत्र
या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या ईमेलवरुन अर्ज केला आहे त्या ईमेल पत्त्यावर परवानगी प्रमाणपत्र अग्रेषित केले जाईल. त्याची प्रिंट काढून सादर पास वापरता येईल असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment