-निवासी संपादक जीतेश लोकचंदानी शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे सध्या कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठी काळजी घेण्यात येत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे 14 एप्रिल पर्यंत येते लॉक डाऊन आहे, मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणारे, किंवा अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडणाऱ्यांना शिर्डीत आता मास्क हे अव्वाच्या सव्वा किमतीला मिळत आहे, काही डुप्लिकेट मास्क बाजारात आल्याचे समजते ,तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन येथील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करावे, अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे
सध्या देशात, राज्यात सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरू आहे, संसर्गजन्य हा आजार असल्याने शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या अहवालानुसार लॉक डाऊन करण्यात आले आहे, नेहमी गजबजलेली शिर्डी सध्या शांत शांत आहे, शिर्डीत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी बसेस, रेल्वे वाहतूक विमान वाहतूक सर्व बंद आहे साईभक्त ही येणे बंद असून दुकाने ,लॉजेस बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे शिर्डी सध्या शांत शांत आहे, मात्र शिर्डीत गोरगरीब व मोलमजुरी करणारेही ही अनेक आहेत ,शिवाय लॉक डाऊन मुळे त्यांना बाहेर पडणे मुश्कील होत आहे ,अशांना संध्याकाळी खाण्यापिण्याची सुद्धा मोठी पंचाईत होत आहे दिवसभर काम करून संध्याकाळी रोजीरोटी मिळवणारे शिर्डीत अनेक आहेत मात्र लोक डाउन मुळे काम ठप्प झाले आहे, त्यामुळे अशांना बाजारात मास्क घेणेही परवडत नाही, शिर्डीत दूध ,मेडिकल भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच त्या घेण्यासाठी दुकानात येणारे यांना मास्क ची मोठी गरज आहे, स्वच्छ शिर्डी ,सुंदर शिर्डीचे देशाचे तीसरे बक्षीस शिर्डीला मिळाले आहे, अशा स्वच्छ सुंदर शिर्डीत आज पर्यंत सर्व नियम पाळत आहेत, लॉक डाऊन मुळे नागरिक बाहेर पडण्याचे टाळत आहेत, अशा शिर्डीत अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मास्क पुरवण्याची गरज आहे कारण सध्या बाजारात मास्क मिळेनासे होत आहे किंवा त्याच्या किमंती अवाच्या सव्वा लावल्या जात आहे ,त्याचप्रमाणे बाजारात डुबलीकेट मास्क आल्याचेही समजते, त्यामुळे येथील नगरसेवक किंवा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आपापल्या वार्ड मध्ये योग्य असे मास्क मोफत वाटप केले तर त्याचा फायदा नागरिकांना चांगला होईल, इतर वेळी किंवा निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध गोष्टींचे वाटप केले जाते परंतु अशा प्रसंगी हे मास्क चे वाटप केले तर ते सर्व दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले असून तशी मागणी शिर्डी करांनी केली आहे.
Post a Comment