-राजेंद्र गड़करी अंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत दररोज श्री साई दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो साईभक्त येत असतात मात्र सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग एकमेकांना होऊ नये किंवा वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे, शिर्डीत त्यामुळे लॉक डाऊन असून श्री साई समाधि मंदिर सह सर्वच बंद आहे, अशा प्रसंगी अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहनधारक तसेच येथे असणारे भिकारी साधू यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थाने अशा गरजवंतांना नाष्टा पाकिटे देऊन या संकट समयी मदत करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहे,
सध्या जगात, देशात, राज्यात सर्वत्र कोरोना ची चर्चा सुरू आहे, देशात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व ठप्प आहे, शिर्डीत अाधी दररोज हजारो साईभक्त येत होते ,परंतु लाक डाऊन मुळे सर्व दुकाने, विमानसेवा, रेल्वे वाहतूक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस, सर्व काही बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर सुद्धा बंद असल्याने साई भक्त एकही येत नाही श्री साईबाबा संस्थाने मंदिराबरोबरच आपली सर्व भक्त निवासस्थाने व प्रसादालही बंद केले आहे, त्यामुळे शिर्डीत असणारे भिकारी साधू यांचा या काळात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ,अशासाधू संतांसाठी तसेच येथे प्रसादालय वर अवलंबून असणारे भिकारी यांना श्री साईबाबा संस्थाने मोफत नाश्ता पाकिटे पुरवावीत, त्याच प्रमाणे राज्यात देशात अत्यावश्यक सेवा पुरवणारे मग ते दूध टँकर असो, भाजीपाला किंवा किराणामाल ट्रक असो अश्या ट्रक चालकांना रस्त्यात सर्वकाही बंद असल्यामुळे जेवण तर दूरच पण चहा सुद्धा मिळणे मुश्कील होत आहे, तरी श्री साईबाबा संस्थान नगर मनमाड या महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक चालकांना नाष्टा पाकिटे दिली तर त्यांचा अशा समयी चांगला उपयोग होईल अशी मागणी शिर्डी मधून होत आहे
शिवाय श्री साईबाबा संस्थान कडे नाष्टा पाकिटे बनवण्याची यंत्रणा सज्ज असते ,भविष्यात जर बाका प्रसंग याविषाणू मुळे निर्माण झाला तर शिर्डी परिसरात किंवा जिल्ह्यात किंवा आणीबाणी प्रसंगी महत्त्वाच्या ठिकाणी असे अन्न किंवा नाष्टा पाकीट कसे पोहोचवता येतील याची नियोजन किंवा तयारी ही श्री साई संस्थान करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.
Post a Comment